मुंबई

बजाज फायनान्स आणि एलआयसी हाउसिंगच्या कर्जदरात वाढ

कर्जदरात वाढ करूनही स्पर्धात्मक दरात आणि वेगवेगळ्या ऑफर्स देत असल्याचे या कंपन्यांचा दावा आहे.

वृत्तसंस्था

मॉर्गेज कर्जपुरवठा करणाऱ्या बजाज हाउसिंग फायनान्स आणि एलआयसी हाउसिंग फायनान्सने सोमवारी कर्जावरील व्याजदरात ०.५० टक्का वाढ केल्याची घोषणा केली. रिझर्व्ह बँकेने वाढत्या महागाईलाआळा घालण्यासाठी मे महिन्यापासून आतापर्यंत रेपोरेटमध्ये १.४० टक्के वाढ केल्यानंतर सर्वच बँका, वित्तीय कंपन्यांनी कर्जदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. तथापि, कर्जदरात वाढ करूनही स्पर्धात्मक दरात आणि वेगवेगळ्या ऑफर्स देत असल्याचे या कंपन्यांचा दावा आहे.

एलआयसी हाउसिंग फायनान्सने मुख्य व्याजदरात ०.५० टक्का वाढ केल्याने गृहकर्जाचा नवा व्याजदर पूर्वीच्या ७.५० टक्क्यांवरुन ८ टक्क्यांपासून सुरु झाला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक वाय. विश्वनाथ गौड म्हणाले की, व्याजदर वाढविण्यात आला असला तरी गृहकर्जाची मागणी वाढलेली राहील.

आरबीएल बँकेने एमसीएलआर दरात १० ते १५ टक्का वाढ केली आहे. त्यामुळे कर्जाचा दर ८.०५ टक्के ते ९.२५ टक्क्यांच्या दरम्यान राहील. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने व्याजदरात वाढ करावी लागत असल्याचे बँकेने वेबसाईटवर नमूद केले आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला