मुंबई

वांद्रे येथे साकारतेय ५२ फुटी काशी विश्वनाथ मंदिर; पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त खास आरास

वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त ५२ फुट उंचीचे हुबेहुब काशी विश्वनाथ मंदिर साकारण्यात येते आहे. शिवाय राज्य महोत्सव म्हणून या मंडळातर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त ५२ फुट उंचीचे हुबेहुब काशी विश्वनाथ मंदिर साकारण्यात येते आहे. शिवाय राज्य महोत्सव म्हणून या मंडळातर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षीचे ३०वे वर्ष असून दरवर्षी एक प्रसिद्ध मंदिराची आरास या मंडळातर्फे केली जाते. गतवर्षी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक मंदिर तर, त्या पूर्वी उज्जेकन येथील महाकाल मंदिर, केदारनाथ मंदिर, पशुपतीनाथसह महाराष्ट्रातील विठ्ठल मंदिर, शिर्डिचे साई समाधी मंदिर अशा विविध मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात आली होती. तर मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात लोकामन्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती.

विविध जाती धर्मीयांची वस्ती असलेल्या रेक्लेमेशन येथे हा गणेशोत्सव साजरा होत असून या उत्सवात सर्वधर्मीय सहभागी होतात आणि मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतात हेही त्याचे वैशिष्ट. तसेच दरवर्षी चित्रपट, क्रीडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळामध्ये हे मंडळ लक्षवेधी ठरले आहे.

श्री काशी विश्वेश्वर मंदिराविषयी

श्री काशी विश्वेश्वर हे बारा ज्योतिलिंगंपैकी एक आहे. हे मंदिर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असून मंदिर पवित्र गंगा नदीच्या पश्चिम तीरावर आहे. क्रूर आक्रमक तुद्दीन ऐबक याने हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. शतकांनंतर अहिल्याबाई होळकर यांनी तेथे विश्वनाथ मंदिर बांधले. त्यांच मंदिराची हुबेहुब प्रतिकृती वांद्रे येथे साकारण्यीत आली आहे. मंदिराचा कळस, वैशिष्टपूर्ण खांब, विश्वेश्वराची पिंड या सगळ्यांची हुबेहुब प्रतिकृती साकरली जाणार आहे. यासोबतच या संपूर्ण परिसरात दिव्यांची खास रोषणाई करण्योत आली असून तरुणांसाठी ही रोषणाई खास आकर्षण ठरणार आहे, असा विश्वाशस मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी व्यक्त केला आहे.

प्रतीक्षा संपली, बाप्पा आज घरोघरी! चैतन्यमूर्तीच्या आगमनासाठी मुंबईसह राज्यात उत्साहाला उधाण

भारतावर 'टॅरिफ' विघ्न! अमेरिकेकडून अतिरिक्त २५ टक्के 'टॅरिफ' लागू; भारताच्या ४८ अब्ज डॉलरच्या निर्यातीला फटका

हायकोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम

मुंबईच्या लढाईत ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने; गणेश मंडळांसाठी शिवसेनेची रणनीती

आता दररोज १३ तास काम! वाढीव तास काम करण्यास मुभा; महिलांना रात्रीच्या शिफ्टसाठी परवानगी