Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात 
मुंबई

Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या रेल्वे मार्गिका प्रकल्पाचा एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेने वांद्रे स्थानकावर एका नवीन फलाटाच्या बांधकामाची तयारी सुरू केली आहे.

Swapnil S

अभिषेक पाठक/मुंबई

प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या रेल्वे मार्गिका प्रकल्पाचा एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेने वांद्रे स्थानकावर एका नवीन फलाटाच्या बांधकामाची तयारी सुरू केली आहे. वांद्रे स्थानकाच्या पूर्व बाजूला प्रस्तावित असलेला नवीन फलाट क्र. ८ हा सहाव्या मार्गिकेशी जोडला जाईल आणि प्रकल्पाच्या अंतिम जोडणीचा हा एक महत्त्वाचा भाग ठरेल, अशी अपेक्षा आहे.

प्रस्तावित जागेवरील अतिक्रमणे हटवणे आवश्यक असल्यामुळे या बांधकामात विलंब झाला होता. वांद्रे पूर्वेकडील गरीबनगर येथील प्रकल्पग्रस्त रहिवाशांचे पुनर्वसन आता पूर्ण होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या भागातील १०० पात्र प्रकल्पग्रस्तांपैकी ९४ जणांचे पुनर्वसन एमएमआरडीएने आधीच केले असून उर्वरित प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे. स्थलांतर पूर्ण झाल्यानंतर जागेवरील अनधिकृत बांधकामे हटवली जातील आणि नवीन फलाटाचे काम सुरू करता येईल.

वांद्रे-खार रेल्वे उड्डाणपुलाची पुनर्रचना करणार

हा प्रस्तावित फलाट स्थानकाच्या पूर्व बाजूकडील सध्याच्या फलाट क्र. ७ च्या बाजूला उभारला जाईल. सेवा इमारत आणि इतर रेल्वे संरचनांसह संबंधित कामांची तयारीही सुरू आहे. सध्या वांद्रे स्थानकात सात फलाट आहेत. फलाट १ ते ४ मुख्य मार्गावरील लोकल सेवांसाठी आहेत, तर फलाट ५ ते ७ हार्बर मार्गावरील गाड्यांसाठी वापरले जातात. फलाट क्र. ८ च्या भर पडल्यामुळे स्थानकातील एकूण फलाटांची संख्या आठ होईल. दादर-खार रोड पट्टा यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असून व्यापक कामांचा एक भाग म्हणून वांद्रे-खार रेल्वे उड्डाणपुलाची पुनर्रचना करण्याचेही नियोजन आहे.

२०२९ पर्यंत दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण होणार

पश्चिम रेल्वेने ५.६९ किमी लांबीच्या मुंबई सेंट्रल ते दादर सहाव्या मार्गिकेचे काम मार्च २०२९ पर्यंत आणि ७.६४ किमी लांबीच्या दादर-खार रोड टप्प्याचे काम डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वांद्रा पूर्वेकडील पुनर्वसन अंतिम टप्प्यात आल्याने प्रस्तावित फलाट क्र. ८ मुळे नवीन मार्गिका विद्यमान उपनगरीय नेटवर्कशी जोडण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल, अशी अपेक्षा आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सत्ताधारी महायुतीत बंडखोरीची चिन्हे; विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवार जाहीर

सोयाबीनच्या उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांची घट; शेतकरी, व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग आर्थिक संकटात

डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके बसणार! एल निनोची तीव्रता वाढणार, सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

Mumbai : गेमचा आयडी वापरला म्हणून चाकूहल्ला; तरुण गंभीर जखमी