मुंबई

मुंबई मेट्रोविरोधात दिवाळखोरीची याचिका; इंडियन बँकेचा अर्ज

एमएमओपीएल ही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर व एमएमआरडीएची संयुक्त कंपनी आहे.

Swapnil S

मुंबई : वर्सोवा-घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो रेल्वेची व्यवस्थापन कंपनी मुंबई मेट्रो वन प्रा. लिमिटेडच्या विरोधात इंडियन बँकेने दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणी हे पाऊल बँकेने उचलले आहे.

एमएमओपीएल ही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर व एमएमआरडीएची संयुक्त कंपनी आहे. यापूर्वी आयडीबीआय बँक व स्टेट बँक ऑफ इंडियाने यापूर्वीच एमएमओपीएलविरोधात दिवाळखोरी याचिका दाखल केली आहे. एमएमओपीएलवर सर्व बँकांचे १७११ कोटींचे कर्ज आहे.ऑगस्ट २०२२ मध्ये एमएमओपीएलविरोधात एसबीआयने दिवाळखोरी याचिका दाखल केली होती. तेव्हा एमएमओपीएलसमोर सर्वात मोठे आव्हान उभे राहिले होते. एसबीआयने ४१६.०८ कोटी वसूल करण्यासाठी दिवाळखोरी संहितेच्या कलम ७ अनुसार याचिका दाखल केली आहे. दिवाळखोरीची कारवाई जसजशी उघड होईल, त्याप्रमाणे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​भवितव्य आणि तिच्या आर्थिक संकटाच्या निराकरणावर संबंधित भागधारकांकडून बारकाईने निरीक्षण केले जाईल.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?