Mumbai : बेलासिस पुलाचे सुरक्षा प्रमाणपत्र जारी; पश्चिम रेल्वेची माहिती Photo : X (mybmc)
मुंबई

Mumbai : बेलासिस पुलाचे सुरक्षा प्रमाणपत्र जारी; पश्चिम रेल्वेची माहिती

बेलासिस पुलाचे सुरक्षा प्रमाणपत्र रेल्वेच्या सक्षम प्राधिकरणाने आधीच जारी केले असून त्यासंदर्भात संबंधित पालिका प्रशासनालाही औपचारिकरित्या कळविले आहे. 'रेल्वेने अडविला बेलासिस पुलाचा मार्ग या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

Swapnil S

मुंबई : बेलासिस पुलाचे सुरक्षा प्रमाणपत्र रेल्वेच्या सक्षम प्राधिकरणाने आधीच जारी केले असून त्यासंदर्भात संबंधित पालिका प्रशासनालाही औपचारिकरित्या कळविले आहे. 'रेल्वेने अडविला बेलासिस पुलाचा मार्ग या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

मुंबई सेंट्रल स्थानकातील पूर्व व पश्चिमेला जोडणारा बेलासिस पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने बंद करत पुलाची पुनर्बाधणी निर्णय घेतला. पालिका मुंबई करण्याचा प्रशासनाने महानगरपालिकेने बेलासिस पुलाच्या पुनर्बाधणीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे. पुलाला संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र तसेच सुरक्षितता प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. मात्र पश्चिम रेल्वेकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले नसल्याचे पालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये नमूद केले होते.

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या साने गुरुजी रोड व लॅमिंग्टन रोड यांना जोडणाऱ्या बेलासीस रोड उड्डाणपुलाच्या पुनर्बाधणीचे काम मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर रेल्वे हद्दीतील काम पूर्ण झालेले आहे. हे काम पश्चिम रेल्वेने प्राधान्य देत पूर्ण केलेले आहे. या उड्डाणपुलाची २१ जून २०२५ रोजी तपासणी करण्यात आली असून, तपासणीनंतर हा पूल सार्वजनिक वापरासाठी सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार रेल्वे हद्दीतील कामासाठी सक्षम रेल्वे प्राधिकरणामार्फत सुरक्षा प्रमाणपत्र (Safety Certificate) जारी करण्यात आले आहे.

दिल्ली विमानतळावर दोन विमानांची धडक; अकासा एअर आणि स्पाइसजेटचे नुकसान, प्रवासी सुखरूप

TCS प्रकरणात दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम चौकशीसाठी नाशिकमध्ये; १५० कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे निर्देश

गोरेगावमधील मोतीलालनगर पुनर्विकासाचा मास्टर प्लान लवकरच; उच्च दर्जाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार

VIDEO : लखनऊमधील झोपडपट्टीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांमुळे शेकडो झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर

Bigg Boss Marathi 6: पहिली फायनलिस्ट तन्वी कोलते अडचणीत? 'त्या' वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप, विजेतेपदाच्या चर्चेला नवं वळण