भांडुप बेस्ट बस अपघात प्रकरणी चालकावर कारवाई; विक्रोळी आगारातील तपासणीत हँडब्रेकमध्ये दोष नसल्याचा निष्कर्ष 
मुंबई

भांडुप बेस्ट बस अपघात प्रकरणी चालकावर कारवाई; विक्रोळी आगारातील तपासणीत हँडब्रेकमध्ये दोष नसल्याचा निष्कर्ष

भांडुप पश्चिम येथे रविवारी बेस्ट बसचा हँडब्रेक न लागल्याने बस मागे गेली आणि अपघात झाला. यात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र गर्दीच्या वेळी अपघात झाला असून हँडब्रेकमध्ये कोणताही दोष आढळून आलेला नाही, हे बेस्टच्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे बेस्ट बस चालकावर कारवाई करण्यात येणार आहे, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

Swapnil S

मुंबई : भांडुप पश्चिम येथे रविवारी बेस्ट बसचा हँडब्रेक न लागल्याने बस मागे गेली आणि अपघात झाला. यात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र गर्दीच्या वेळी अपघात झाला असून हँडब्रेकमध्ये कोणताही दोष आढळून आलेला नाही, हे बेस्टच्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे बेस्ट बस चालकावर कारवाई करण्यात येणार आहे, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

१९ एप्रिलला भांडुप पश्चिम रेल्वे स्थानक येथे दुपारी पावणेएकच्या सुमारास बस मार्ग क्रमांक ६०६ मार्गाची बस नरदास नगरची फेरी पूर्ण करून आली असता, बसचा वाहक बेस्ट चौकीमधील अधिकाऱ्याकडे वेळेची नोंद करण्याकरिता बसमधून उतरले. तसेच बसचालक सूर्यवंशी हेसुद्धा नैसर्गिक विधीकरिता बसमधून उतरले. यावेळी बस अचानक पाठीमागे जात असल्याबाबत जमावाने आरडाओरड केली. हे पाहून बसचालक सूर्यवंशी त्वरित बसजवळ आले. परंतु तोपर्यंत बस फुटपाथवरील एसटीडी सेंटरच्या पत्र्याला धडकून थांबलेली होती.

या अपघातात एसटीडी बूथचा पत्रा थोडासा दबला गेला. बसगाडीचे कोणतेही नुकसान नाही आणि यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसचालक सूर्यवंशी यांनी हँडब्रेक लागत नसल्याबाबत तक्रार केल्यामुळे बसची विक्रोळी आगारात तपासणी करण्यात आली.

मात्र तपासणीअंती हँडब्रेकमध्ये कोणताही दोष आढळला नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याबाबत बसचालकविरुद्ध लवकरच कारवाई केली जाईल, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

OTP द्या, पाणी घ्या! टँकर बुकिंगसाठी BMC ची नवी डिजिटल प्रणाली अंतिम टप्प्यात; अनधिकृत पाणीउपसाला बसणार लगाम

Thane : खारेगावमध्ये महापालिकेची पहिली मोफत CBSE शाळा सुरू; पहिल्याच दिवशी १७७ विद्यार्थ्यांचा प्रवेश

Thane : 'लग्न करतो, परदेशात नोकरी देतो' म्हणत महिलांना लुबाडलं; ९० लाखांचा गंडा घालणारा सिरियल कॉनमॅन अटकेत

ओमानजवळ व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नौदलाला इमर्जन्सी कॉल अन् MRCC च्या तत्परतेमुळे २४ भारतीय खलाशांची सुटका

वाढत्या पाणीटंचाईत आजपासूनच करा 'या' गोष्टी; होईल पाण्याची बचत