भांडुपमध्ये ट्रकने तीन कामगारांना चिरडले; एकाचा मृत्यू, दोघे जखमी प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

भांडुपमध्ये ट्रकने तीन कामगारांना चिरडले; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

भांडुप पंपिंग स्टेशनजवळील पूर्व द्रुतगती महामार्गावर भरधाव आयशर ट्रकने रस्ते कामाच्या ठिकाणी बसलेल्या कामगारांना चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. बुधवारी पहाटे झालेल्या या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.

Swapnil S

मुंबई : भांडुप पंपिंग स्टेशनजवळील पूर्व द्रुतगती महामार्गावर भरधाव आयशर ट्रकने रस्ते कामाच्या ठिकाणी बसलेल्या कामगारांना चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. बुधवारी पहाटे झालेल्या या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.

चंदन कुमार मदन प्रसाद (३३) असे मृत कामगाराचे नाव असून तो मूळचा बिहारमधील गोपालगंजचा रहिवासी होता. तो मुलुंड पूर्व येथील म्हाडा कॉलनीमध्ये राहत होता. मंगळवारी रात्री ९च्या सुमाराला तो भांडुप पंपिंग स्टेशनजवळील कामाच्या ठिकाणी रात्रपाळीच्या ड्युटीवर गेला होता. पहाटे सव्वाचारच्या सुमाराला चंदन कुमार आणि त्याचे दोन सहकारी कामाच्या ठिकाणी बसले असताना भरधाव आयशर ट्रकने बॅरिकेड्स तोडून या कामगारांना चिरडले.

या अपघातात जोजो थॉमस आणि मुकेशकुमार सिंह हे दोन कामगार गंभीर जखमी झाले. दरम्यान, ट्रकचालक मोहम्मद ताजीर जान याला ताब्यात घेण्यात आले आहे.

OTP द्या, पाणी घ्या! टँकर बुकिंगसाठी BMC ची नवी डिजिटल प्रणाली अंतिम टप्प्यात; अनधिकृत पाणीउपसाला बसणार लगाम

Thane : खारेगावमध्ये महापालिकेची पहिली मोफत CBSE शाळा सुरू; पहिल्याच दिवशी १७७ विद्यार्थ्यांचा प्रवेश

Thane : 'लग्न करतो, परदेशात नोकरी देतो' म्हणत महिलांना लुबाडलं; ९० लाखांचा गंडा घालणारा सिरियल कॉनमॅन अटकेत

ओमानजवळ व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नौदलाला इमर्जन्सी कॉल अन् MRCC च्या तत्परतेमुळे २४ भारतीय खलाशांची सुटका

वाढत्या पाणीटंचाईत आजपासूनच करा 'या' गोष्टी; होईल पाण्याची बचत