मुंबई

भाईंदर पूर्वेत ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; १७ तरुणींची सुटका, २६ जण ताब्यात

भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या 'प्यासा' ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा टाकून १७ तरुणींची सुटका केली, तर २६ जणांना ताब्यात घेतले. उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Swapnil S

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या 'प्यासा' ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा टाकून १७ तरुणींची सुटका केली, तर २६ जणांना ताब्यात घेतले. उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी बारमध्ये छापा टाकला असता, स्टेजवर सात तरुणी, तर आतील गुप्त खोलीत अन्य १० तरुणी आढळून आल्या. पोलिसांनी या सर्व तरुणींना बाहेर काढून त्यांची सुटका केली.

या कारवाईत १५ ग्राहक, तसेच १० व्यवस्थापक व वेटर आणि एका कॅशियरला ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून सुमारे ६० हजार रुपये रोख आणि अंदाजे ५० हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, कारवाईदरम्यान बारचा मालक आणि संचालक फरार झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांचा शोध सुरू आहे. बारमध्ये नियमांचे उल्लंघन किंवा अन्य गैरप्रकार सुरू होते का, याचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणातील पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान

Mumbai : सहा धरणांच्या सुरक्षेचे ऑडिट; तज्ज्ञ समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार, पालिका ४५ लाख ९० हजार रुपये खर्च करणार

Mumbai : पालिकेचा 'हॅलो ए वॉर्ड' उपक्रम; व्हॉट्सअ‍ॅपवर एआय-संचलित तक्रार निवारण सेवा सुरू

'वारी'वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान