मुंबई

Bhayandar : 'त्या' पोलीस निरीक्षकाची पेल्हार पोलीस ठाण्यात नियुक्ती; लाच प्रकरणात कारवाईऐवजी बदली

आवडीच्या पोस्टिंगसाठी लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकावर ठोस कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत असतानाच, त्यांचीच महत्त्वाच्या पेल्हार पोलीस ठाण्यात नियुक्ती झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Swapnil S

भाईंंदर : आवडीच्या पोस्टिंगसाठी लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकावर ठोस कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत असतानाच, त्यांचीच महत्त्वाच्या पेल्हार पोलीस ठाण्यात नियुक्ती झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत ‘मलाईदार’ नाक्यांवर ड्युटीसाठी अर्थपूर्ण सेटिंग होत असल्याच्या चर्चा नव्या नाहीत. याच पार्श्वभूमीवर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सागर इंगोले आणि सहाय्यक उपनिरीक्षक मनोज गोलार यांच्यावर एका महिला हवालदाराकडून आवडीच्या पोस्टिंगसाठी लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला पोलीस हवालदार कमल चव्हाण यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, ३ सप्टेंबर रोजी मनोज गोलार यांनी सागर इंगोले यांच्यासाठी १५ हजार रुपये, तसेच स्वतःसाठी व सहकारी दत्तात्रय शेंडे यांच्यासाठी प्रत्येकी २,५०० रुपये अशी एकूण २० हजार रुपयांची मागणी केली होती.

५ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर २५ सप्टेंबरला एसीबीने सापळा रचून पडताळणी केली. या वेळी गोलार यांनी १५ हजार रुपयांची मागणी कायम ठेवली आणि ही रक्कम वरिष्ठांना द्यावी लागेल, असे स्पष्ट केले. त्यानंतर दुसऱ्या पडताळणीदरम्यान पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी तडजोड करत लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे समोर आले. तक्रार दाखल झाल्यानंतर गोलार यांची वाहतूक शाखेतून उचलबांगडी करण्यात आली होती, तर इंगोले यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, लाच मागणी सप्टेंबरमध्येच स्पष्ट झाल्यानंतरही तब्बल सहा महिन्यांनी ३० मार्च रोजी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, वाहतूक शाखेतील वसुली, भ्रष्टाचार आणि नियुक्त्यांमधील गैरप्रकारांच्या चर्चांमुळे आधीच वादग्रस्त ठरलेल्या या विभागाकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत होती.

Mumbai : धरणांतील पाणीसाठा घटला; BMC चे नवे नियम जाहीर, पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाईचा इशारा

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

आता डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल तरच मिळेल कफ सिरप; औषध विक्रीच्या नियमात केंद्र सरकारचा मोठा बदल

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर; आता २० जूनला होणार निर्णय

सौरव गांगुलींकडून फेसबुक पेजविरोधात तक्रार दाखल; खोटी माहिती पसरवल्याचा आरोप