प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

Bhayandar : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन रस्त्यावर डोंगरी खदानजवळ मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या (MBMC) घनकचरा विभागाच्या ठेकेदाराच्या भरधाव डंपरने एका दुचाकीला धडक दिल्याने ६२ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Swapnil S

भाईदर : भाईंदर पश्चिमेच्या उत्तन रस्त्यावर डोंगरी खदानजवळ मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या (MBMC) घनकचरा विभागाच्या ठेकेदाराच्या भरधाव डंपरने एका दुचाकीला धडक दिल्याने ६२ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या कचरा वाहक गाड्यांमुळे सातत्याने अपघात घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

मॅक्सेस मॉल परिसरातील सालासर अंजनी आशिष इमारतीत राहणारे गेहरीलाल लालचंद जैन (छाचेड) (६२) हे दुचाकीवरून आपल्या मुलाला कारखान्यात जेवण घेऊन जात होते. डोंगरी खदान येथे कचरा वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात जैन यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच उत्तन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उत्तन पोलिसांनी याप्रकरणी डंपरसह चालक प्रदीप आत्माराम पाटील (रा. सफाळे) याला तातडीने ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

चेंगराचेंगरी हा द्रमुकाचा कट; विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव

GST दर कपातीनंतर NCH ला तीन हजार तक्रारी प्राप्त; ग्राहक व्यवहार सचिवांची माहिती