Bhayandar : खोल समुद्रात उत्तनच्या मच्छिमारांवर हल्ला; पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिल्याचा मच्छिमारांचा आरोप प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Bhayandar : खोल समुद्रात उत्तनच्या मच्छिमारांवर हल्ला; पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिल्याचा मच्छिमारांचा आरोप

देवगड किनाऱ्याजवळ खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या उत्तन येथील मच्छिमारांवर स्थानिक मच्छिमारांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

Swapnil S

भाईदर : देवगड किनाऱ्याजवळ खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या उत्तन येथील मच्छिमारांवर स्थानिक मच्छिमारांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी लाकडी दांडक्यांनी खलाशांना मारहाण करून बोटीच्या केबिनची तोडफोड केली. तसेच बोटीतील मासळी आणि मासेमारीची जाळी लुटून नेल्याचा आरोप पीडित मच्छिमारांनी केला आहे. या घटनेमुळे उत्तनमधील मच्छिमारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

उत्तन येथील डिक्सन तुळजी हे आपल्या 'सोनी' नावाच्या बोटीतून खलाशांसह देवगड किनाऱ्याजवळ मासेमारीसाठी गेले होते. त्यांच्यासोबत उत्तनच्या अन्य तीन बोटीही त्याच परिसरात होत्या.

रात्रीच्या सुमारास स्थानिक मच्छिमारांच्या दोन बोटी तेथे आल्या. 'आमच्या हद्दीत मासेमारी का करता?' असा जाब विचारत त्यांनी वाद घातला. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी लाकडी दांडक्यांनी खलाशांना मारहाण करण्यात आली, तर एका बोटीच्या केबिनच्या काचांचीही तोडफोड करण्यात आली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शेकोटीसाठी कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड! प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेचा दणका

Dombivli : २४ तासांऐवजी ३६ तास पाणीपुरवठा बंद; रहिवासी वैतागले; कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू

अग्निवीरांचा डेटा विकण्याचा प्रयत्न; ५०० डॉलरसाठी १४ वर्षीय हॅकरचे कृत्य

उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौऱ्यावर; राहुल गांधींची घेणार भेट

सीमांकन विधेयकासाठी बहुमताच्या शोधात - काँग्रेस