मुंबई

Bhiwandi : चिमुकलीवर बलात्कार करून हत्या करणारा आरोपी पसार; न्यायालयाच्या आवारात पोलिसांच्या हातावर तुरी

भिवंडी न्यायालयात सोमवारी (दि. ४) सुनावणीसाठी आणण्यात आलेला गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना चकवा देत न्यायालयाच्या आवारातून पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नेहा जाधव - तांबे

भिवंडी न्यायालयात सोमवारी (दि. ४) सुनावणीसाठी आणण्यात आलेला गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना चकवा देत न्यायालयाच्या आवारातून पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपी सलामत अली अन्सारी याने कोर्टाच्या आवारातच पलायन केलं असून, यामुळे पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

६ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. आरोपीने पीडितेचा मृतदेह एका बंद खोलीतील बादलीत लपवून ठेवला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत २० सप्टेंबर २०२३ रोजी आरोपी सलामत अली अन्सारी याला बिहार येथून अटक केली होती. तो ठाणे कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.

न्यायालयीन सुनावणीआधीच पलायन

सोमवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी ठाणे कारागृहातून भिवंडी न्यायालयात नेण्यात आलं होतं. यावेळी सलामत अलीने पोलिसांचा बंदोबस्त असूनही न्यायालयाच्या आवारातून पळ काढला. घटनेनंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली, मात्र आरोपीचा थांगपत्ता लागलेला नाही.

याप्रकरणी PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन सांगळे यांनी म्हटले आहे, "अन्सारीला पकडण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत, त्याच्यावर POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे.''

१५ जानेवारीला मतदानासाठी सुट्टी, सवलत नाही? 'या' क्रमांकावर साधा संपर्क

एकीकडे नवजात बाळाचा जन्म, दुसरीकडे जवान पतीचे अंत्यदर्शन; साताऱ्यातील काळीज पिळवटून टाकणारा Video व्हायरल

भटक्या कुत्र्यांसाठी मिका सिंगची सर्वोच्च न्यायालयाला विनंती; १० एकर जमीन दान करण्याची तयारी

'लाडकी बहीण'चे पैसे निवडणुकीनंतरच द्या! काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

'बॉर्डर २'मधील वरुण धवनच्या अभिनयावर टीका करण्यासाठी ₹५ लाखांची ऑफर; इन्फ्लुएन्सरचा दावा, कॉल रेकॉर्डिंगही केली शेअर