मुंबई : लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी त्यांच्या मतदार संघात मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामिनी जाधव यांच्या या कार्यक्रमावर विरोधकांनी टीका केली असताना शिवसेनेचा मुख्य सहयोगी पक्ष भाजपने देखील आक्षेप घेतला आहे. हा कार्यक्रम त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आहे. भाजप अशा कार्यक्रमाशी सहमत नाही, अशी भूमिका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मांडली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात आपली छाप कायम ठेवण्यासाठी भायखळा मतदारसंघातील विद्यमान आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा बॅनर चर्चेचा कारण ठरला होता. या कार्यक्रमावर भाजपने आक्षेप घेतला आहे.
यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला तो त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आहे. भाजपचा त्याच्याशी काही संबंध नाही. भाजप अशा कार्यक्रमाशी सहमत नाही, अशी स्पष्ट भूमिका आशिष शेलार यांनी मांडली.