भाजपच्या टोळीने पराभव केला; समाधान सरवणकर यांचा गंभीर आरोप  
मुंबई

भाजपच्या टोळीने पराभव केला; समाधान सरवणकर यांचा गंभीर आरोप

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुती म्हणून लढले. मात्र महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप विरुद्ध शिंदेसेना असा वाद समोर आला असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी वॉर्ड क्रमांक १९४ मधून आपण पराभूत झाल्याचा ठपका भाजपवर ठेवला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुती म्हणून लढले. मात्र महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप विरुद्ध शिंदेसेना असा वाद समोर आला असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी वॉर्ड क्रमांक १९४ मधून आपण पराभूत झाल्याचा ठपका भाजपवर ठेवला आहे. भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीत सहकार्य केले, मात्र भाजपच्या एका टोळीने पराभूत केले, असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर यांनी केला आहे.

प्रभादेवी-वरळी हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड १९४ मध्ये समाधान सरवणकर यांचा पराभव झाला. या वॉर्डातून ठाकरे सेनेचे उमेदवार निशिकांत शिंदे विजयी झाले. या निकालावर समाधान सरवणकर यांच संताप व्यक्त केला. माझ्या प्रभागात मला पाडण्यासाठी चार-पाच आमदार व दोन पक्षप्रमुखांची मुले तळ ठोकून होती. सर्वांचे मुख्य टार्गेट मीच होतो. मतदार माझ्यासोबत होते. पण भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने युती धर्माला हरताळ फासला.

'त्या' पदाधिकाऱ्याने दिशाभूल केली

भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना व्हॉट्सॲप मेसेज करून सरवणकरांना मदत करू नका, असे स्पष्ट आदेश दिले होते. आपल्याला वरून काहीतरी आलेले आहे, असे भासवून कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यात आली. भाजपचा अधिकृत शिक्का असल्याने कार्यकर्त्यांनी त्या पदाधिकाऱ्याचे ऐकले. त्यामुळे आम्हाला मिळणारी मदत जाणीवपूर्वक रोखण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन