Mumbai : बीकेसी शॉपिंग मॉलमध्ये तिघा संशयितांना अटक Instagram : ptinews_multimedia
मुंबई

Mumbai : बीकेसी शॉपिंग मॉलमध्ये तिघा संशयितांना अटक

वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील एका शॉपिंग मॉलमध्ये शस्त्र घेऊन जबरदस्तीने प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मात्र या घटनेचा मंगळवारी संध्याकाळी बीकेसीतील पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाशी कोणताही संबंध नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Swapnil S

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील एका शॉपिंग मॉलमध्ये शस्त्र घेऊन जबरदस्तीने प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मात्र या घटनेचा मंगळवारी संध्याकाळी बीकेसीतील पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाशी कोणताही संबंध नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ही घटना सोमवारी बीकेसीतील ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ येथे घडली.

व्यावसायिक परिसर असलेल्या बीकेसीतील या हाय-एंड शॉपिंग मॉलमध्ये तीन संशयितांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मॉलच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले असता, आरोपींनी एक संशयास्पद सरकारी ओळखपत्र दाखवले, रक्षकांशी हुज्जत घातली आणि जबरदस्तीने आत प्रवेश केला, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मॉल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून बीकेसी पोलीस ठाण्यात 'सरकारी अधिकारी असल्याचे भासवणे आणि घातक शस्त्रासह बेकायदेशीर प्रवेश करणे या कलमांखाली तक्रार नोंदवण्यात आली.

आरोपींनी दाखवलेल्या ओळखपत्राची सत्यता तपासण्यासाठी आणि या घुसखोरीमागील त्यांचा नेमका हेतू काय होता, याचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखा (क्राईम ब्रांच) या प्रकरणाचा समांतर तपास करत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शेकोटीसाठी कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड! प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेचा दणका

झोपेचं सोंग घेऊन महिलेशी अश्लील चाळे; जाग येताच महिलेने लगावली थप्पड, रुग्णालयातील VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर GTA 6 फोटो ट्रेंडची धूम! तुमचाही फोटो दिसेल व्हाइस सिटी पोस्टरसारखा; जाणून घ्या सोपी ट्रिक

UP Viral Video : घटस्फोट न घेताच दुसऱ्या लग्नाचा घाट; बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात, पहिल्या पत्नीने उधळला डाव

Dombivli Crime : ७ वर्षांचं प्रेम संपलं अन् तरुणाचा संताप अनावर; पेट्रोल टाकून माजी प्रेयसीचं घर पेटवण्याचा प्रयत्न