राणीबागेत लवकरच येणार काळवीट Canva
मुंबई

राणीबागेत लवकरच येणार काळवीट, पुणे आणि औरंगाबाद प्राणी संग्रहालयाशी साधला संपर्क

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीची बाग नव्या पाहुण्यासाठी सज्ज झाले आहे.

Swapnil S

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीची बाग नव्या पाहुण्यासाठी सज्ज झाले आहे. तब्बल पाच वर्षांनी या प्राणी संग्रहालयात काळवीट येणार आहेत. या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी संस्थेने पुणे आणि औरंगाबाद प्राणी संग्रहालयाशी संपर्क साधला आहे. त्यामुळे पर्यटकांना लवकरच या प्राणी संग्रहालयात काळवीट पाहण्याची संधी मिळणार आहे.

एका कळपात साधारण १० ते ३० काळवीट असतात. काही वर्षांपूर्वी प्राणी संग्रहालयात ४० पेक्षा जास्त काळवीट होते. यापैकी बरेच प्राणी वृद्धापकाळामुळे मरण पावले. मधल्या काळात प्राणी संग्रहालयाचे नूतनीकरण सुरू असताना नवीन जोड्या आणल्या गेल्या नाहीत. त्यामुळे सध्या प्राणी संग्रहालयात काळवीट नाही.

प्राणीसंग्रहालयात पांढरे सिंह, चित्ता, चिंपांझी, माकडे, फ्लेमिंगो आणि काळवीट आणण्याची योजना आखली आहे. आम्ही पुणे आणि औरंगाबाद येथील प्राणी संग्रहालयाशी संपर्क साधला आहे आणि आम्हाला सकारात्मक प्रतिसादाची आशा आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आम्ही आमच्या प्राणी संग्रहालयात काळवीट आणू शकू, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

भायखळा प्राणी संग्रहालयात सुमारे ३३५ प्राण्यांचे वास्तव्य आहे. विविध पक्षी, सरपटणारे प्राणी, माकडे, मगरी, एक हत्ती, हरीण, पाणघोडा, पेंग्विन यांचा त्यात समावेश आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी