मुंबई

मुंबई मेट्रोमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाका; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी, अधिकाऱ्यांचे कारवाईचे आश्वासन

मुंबई मेट्रोच्या ऑपरेशन विभागात मनुष्यबळ पुरविण्याच्या कंत्राट कामात भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई मेट्रोच्या ऑपरेशन विभागात मनुष्यबळ पुरविण्याच्या कंत्राट कामात भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबत संबंधितांविरुद्ध प्रस्तावित करण्यात आलेली कारवाई प्रशासकीय स्वरूपाची असून वेळ काढूपणाची आहे. तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी संबंधित कंत्राटदार कंपनीला तत्काळ काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) महामुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.

मेट्रो दोन आणि सात मार्गिकेसाठी ५०० इतके मनुष्यबळ पुरवण्याचे काम एका संस्थेत देण्यात आले होते. संबंधित संस्थेकडून दहा टक्के मनुष्यबळ कमी पुरविण्यात येत होते. मात्र तरीही कंत्राटदाराला ५०० माणसांसाठी मोबदला देण्यात येत होता. प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकून कंपनीच्या संचालकांविरुद्ध आणि भ्रष्टाचारात सामील मेट्रो अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाचा मुख्य व्यवस्थापक रुबल अग्रवाल यांची भेट घेऊन केली.

यावेळी रुबल यांनी शिष्टमंडळाला ठोस आश्वासन दिले. या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. दहा दिवसांमध्ये अहवाल आल्यानंतर कंपनी विरोधात कारवाई करून त्यांना कळ्या यादी टाकून, पुरेशे मनुष्य बळ न पुरवताही जो भ्रष्टाचार झालाय त्याची रक्कम देखील वसूल करणार असे आश्वासन दिले असल्याचे मातेले यांनी सांगितले.

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर होण्याची शक्यता; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव