मुंबई

रक्तस्त्राव, रक्ताच्या गुठळ्यांवर आता वाडियात उपचार

Swapnil S

मुंबई : रक्तस्राव, रक्ताच्या गुठळ्या असलेल्या बाल रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले आहे. परळ येथील वाडिया रुग्णालयात हेमोस्टॅसिस, थ्रोम्बोसिसचे विकार असलेल्या मुलांसाठी विशेष क्लिनिक सुरू केले आहे. बाल रुग्णाच्या विशेष गरजांनुसार सर्वसमावेशक, वैयक्तिक काळजी घेण्यासाठी हे क्लिनिक उभारण्यात आले आहे.

हमीद फाउंडेशनसारख्या अनेक स्वयंसेवी संस्थांकडून हिमोफिलिया असलेल्या मुलांना मदतीचा हात मिळत आहे. वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला आणि रुमाना, हमीद ट्रस्टच्या यांच्या हस्ते या क्लिनिकचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला.

मुलांमध्ये हेमोस्टॅसिस आणि थ्रोम्बोसिस या विकारांचे निदान होत आहे, ज्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. कुपोषण, संसर्गजन्य रोग आणि अनुवांशिकता यासारखे घटक या परिस्थितीस कारणीभूत ठरतात. सर्वसामान्यांमध्ये या विकारांबद्दल पुरेशा जागरूकतेचा अभाव दिसून येतो. या परिस्थितीला योग्यरित्या हाताळण्यासाठी वाडिया हॉस्पिटलमध्ये विशेष क्लिनिकची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हेमोस्टॅसिस आणि थ्रोम्बोसिसच्या विकारांनी पीडित भारतातील बाल रुग्णांना या सेवेचा फायदा होईल.

हेमोस्टॅसिस आणि थ्रोम्बोसिस विकारांमध्ये हिमोफिलिया ए आणि बी, वॉन विलेब्रँड रोग, दुर्मिळ असे अनुवंशिक रक्तस्त्राव विकार जसे की, ऍफिब्रिनोजेनेमिया, फॅक्टर १३ ची डेफिशिएन्सी, धमनी आणि शीरासंबंधीचा थ्रोम्बोसिस यांचा समावेश आहे.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आज

गुजरातमध्ये ‘जुनं फर्निचर’ची कथा! मुलाने संपर्क तोडल्याने आई-वडिलांची आत्महत्या;आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

Mumbai: आयआयटी कानपूरच्या २२ वर्षीय ग्रॅज्युएटने माहीममधील अपार्टमेंटमध्ये केली आत्महत्या!

Abdu Rozik: बिग बॉस फेम अब्दू रोजिक लग्नाच्या तयारीत, सोशल मीडियावरून शेअर केली गोड बातमी

शरद पवारांचे वक्तव्य संभ्रम पसरविण्यासाठी; प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाबाबत अजित पवारांचा खुलासा