संग्रहित छायाचित्र 
मुंबई

मुंबईकरांनो सावधान! अरबी समुद्र खवळणार, उंच लाटा उसळणार; आजपासून ३ दिवस मोठी भरती; किनारी जाणे टाळा - BMC चे आवाहन

BMC द्वारे, मुंबई पोलिसांद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे येणाऱ्या अनुयायांनीदेखील समुद्रकिनारी योग्य खबरदारी बाळगावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Krantee V. Kale

मुंबई : समुद्रात ४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग ३ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. या भरती दरम्यान समुद्रामध्ये ४.५ ते ५.०३ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत मोठ्या भरतीचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भरतीचा दिनांक व वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे.

भरतीचा दिनांक, वेळ आणि लाटांची उंची

मुंबईत ४ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजून ५२ मिनिटांनी ४.९६ मीटरच्या, ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी ४.१४ मीटरच्या, ६ डिसेंबरला मध्यरात्री १२ वाजून ३९ मिनिटांनी ५.०३ उंचीच्या तर दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी ४.१७ मीटरच्या आणि ७ डिसेंबरला १ वाजून २७ मिनिटांनी ५.०१ मीटरच्या तर दुपारी १ वाजून १० मिनिटांनी ४.१५ मीटरच्या लाटा उसळतील.

समुद्रकिनाऱ्याजवळ न जाण्याचे आवाहन

मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्या नजीक जाऊ नये तसेच या अनुषंगाने महापालिकेद्वारे मुंबई पोलिसांद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे येणाऱ्या अनुयायांनीदेखील समुद्रकिनारी योग्य खबरदारी बाळगावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

MLC Election 2026 : शिक्षक, ‘पदवीधर’साठी आज मतदान; मतदानासाठी यंत्रणा सज्ज; पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात

CJP चे आज देशव्यापी आंदोलन; दीपके, राकेश टिकैतसह परकला सीतारामन, प्रकाश राज यांची उपस्थिती

जरांगेंचा धमाका; ५०० कोटींच्या दाव्याची ऑडिओ क्लिप जारी, कट-कारस्थान रचल्याचा शिंदेसेनेचा आरोप

अनिल पंडित ‘वाँटेड’ घोषित; लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा संशय, चार आरोपींना २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

निदर्शने, आंदोलने कामाची नाहीत; राहुल गांधी यांचे नाव न घेता अमित शहा यांची टीका