'एआय' ने बनविलेली प्रतिमा
मुंबई

Mumbai : सफाई कामगारांना मिळणार हक्काचे निवासस्थान; BMC करणार ३० वसाहतींचा पुनर्विकास; १,१२० कोटींची तरतूद

मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांसाठी ‘आश्रय’ योजनेंतर्गत ३०० चौरस फुटांची १२ हजार घरे बांधणार आहे. दोन टप्प्यात ही घरे बांधण्यात येणार असून यासाठी १,१२० कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांसाठी ‘आश्रय’ योजनेंतर्गत ३०० चौरस फुटांची १२ हजार घरे बांधणार आहे. दोन टप्प्यात ही घरे बांधण्यात येणार असून यासाठी १,१२० कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत २९ हजार सफाई कामगार कार्यरत आहेत. ‘स्वच्छ व सुंदर मुंबई’साठी सफाई कामगार दिवसरात्र झटत असतात. मुंबईची स्वच्छता करत असताना अनेक कामगारांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी दिवसरात्र झटणाऱ्या सफाई कामगारांचे राहणीमान सुधारण्यासाठी मुंबई पालिकेच्या माध्यमातून सफाई कामगारांसाठी ‘आश्रय’ योजनेंतर्गत घरे उपलब्ध करण्यात येणार आहेत. ३०० चौरस फुटांची सुमारे १२,००० सेवानिवासस्थाने दोन टप्प्यात बांधण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात, ‘ए’ विभागातील कोचिन स्ट्रीट, आर/दक्षिण विभागातील पॉवेल्स लँड व ‘ई’ विभागातील सिद्धार्थनगर या वसाहतींच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले असून त्या सफाई कामगारांना हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. तसेच, ‘ई’ विभागातील टँकपाखाडी आणि एफ/दक्षिण विभागातील गौतम नगर या ठिकाणी कर्मचारी निवासस्थानांच्या पुनर्विकासाची कामे प्रगतिपथावर आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात ३० ठिकाणांच्या कामांचे कार्यादेश यापूर्वीच देण्यात आले आहेत, ज्यापैकी २३ ठिकाणी पुनर्विकासाची कामे सुरु करण्यात आली आहेत आणि उर्वरित ७ ठिकाणची कामे लवकरच सुरु होणार आहेत.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती