(बीएमसीचे संग्रहित छायाचित्र)
मुंबई

आयुक्तांच्या बंगल्याची ४.५६ लाखांची थकबाकी; १४ वर्षांपासून कर अदा केलाच नाही

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाच्या कर निर्धारण व संकलक विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पण पालिका आयुक्त बंगल्याची मागील १४ वर्षांची कर थकबाकी ४.५६ लाख आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आयुक्त कार्यालयाकडे २९ डिसेंबर २०२३ रोजी अर्ज करत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी आपल्या बंगल्यावर वीज सुविधांसाठी केलेल्या खर्चाबाबत मागील ५ वर्षांची माहिती देताना दर महिन्याला एकूण वीज आकार खर्च, वापरलेले युनिट याची माहिती मागितली होती. अनिल गलगली यांचा अर्ज आयुक्त कार्यालयाने डी विभागाच्या जलखात्याकडे हस्तांतरित केला. जल खात्याने अर्ज करनिर्धारक व संकलक खात्याकडे हस्तांतरित केला. अनिल गलगली यांस ५ जून २०२४ पर्यंतची माहिती दिली.

१ एप्रिल २०११ पासून ३१ मार्च २०२३ पर्यंतची थकबाकी ३.८९ लाख होती. तसेच १ एप्रिल २०२३ पासून ३१ मार्च २०२४ पर्यंतचे चालू बिल देयक ६७, २७८ इतके आहे. यात सर्वसाधारण कर आणि जल कराचा समावेश आहे. विशेष म्हणजे जलमापक विरहित जलजोडणी आहे. आयुक्त असो किंवा सामान्य नागरिक प्रत्येकांनी वेळेवर कर अदा करणे आवश्यक आहे. तसेच जलमापक लावणे आवश्यक आहे, असे मत गलगली यांनी व्यक्त केले.

कर रक्कम भरण्याची प्रक्रिया सुरू; पालिकेचे स्पष्टीकरण

आयुक्त बंगल्याच्या मालमत्ता कर रकमेचे देयक ५ मार्च २०२४ रोजी देण्यात आले होते. मालमत्ता कराचे देयक दिल्यापासून त्याचा भरणा करण्याची मुदत तीन महिन्यांची असते, असे असले तरी, ही संपूर्ण कर देयक अर्थात रुपये ४ लाख ५६ हजार इतका भरणा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस