राज्य निवडणूक आयोगाकडून BMC निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती; इक्बाल सिंग चहल यांच्यावर मोठी जबाबदारी 
मुंबई

राज्य निवडणूक आयोगाकडून BMC निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती; इक्बाल सिंग चहल यांच्यावर मोठी जबाबदारी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. कोणत्या शहरात कोणते निरीक्षक असणार आहेत? वाचा सविस्तर...

किशोरी घायवट-उबाळे

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने (SEC) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल यांची बुधवारी (दि. ३१) मुख्य निरीक्षक (Observer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१९८९ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले इक्बाल सिंग चहल यांनी मे २०२० पासून जवळपास चार वर्षे मुंबई महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.

२८ महानगरपालिकांसाठीही निरीक्षकांची नियुक्ती

ही निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता लक्षात घेऊन तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारीही अतिरिक्त निरीक्षक म्हणून नेमण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील उर्वरित २८ महानगरपालिकांसाठीही आयएएस अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणत्या ठिकाणी कोणते निरीक्षक?

ठाण्यात एमआयडीसी (MIDC) चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू, कल्याण-डोंबिवलीमध्ये एमआयडीसी (MIDC) संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंताडा राजा दयानिधी, मीरा-भाईंदर येथे कौशल्य विकास आयुक्त अमित सैनी, उल्हासनगर शहरात एमटीडीसी (MTDC) व्यवस्थापकीय संचालक निलेश गाटणे तर भिवंडी-निजामपूर येथे आदिवासी विकास महामंडळाचे अतिरिक्त आयुक्त गोपीचंद कदम यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप आणि शिवसेना यांच्यात तीव्र संघर्ष

निवडणूक आयोगाने नवी मुंबईत भाजपच्या दोन गटांमध्ये तसेच भाजप आणि शिवसेना यांच्यात तीव्र संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली आहे. तेथे महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब दांगडे यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

वसई-विरार येथे पूर्वीपासून निवडणूक काळात तणावाचे वातावरण राहिल्याने महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डचे सीईओ (CEO) प्रदीप पी. यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर पनवेल येथे आयसीडीएस (ICDS) आयुक्त कैलास पगारे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

Pune Traffic Update : नववर्षाच्या जल्लोषासाठी फिरायला जाताय? मग त्याआधी पुण्यातील वाहतुकीचे 'हे' बदल वाचाच

"ही तर इच्छाधारी मेट्रो..." ; एकता कपूरच्या Naagin 7 चं हटके प्रमोशन, व्हायरल Videoवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

BMC Election 2026 : भाजपकडून १३६ उमेदवार निश्चित; कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार, वाचा सविस्तर

धावत्या व्हॅनमध्ये तरुणीवर गँगरेप; लिफ्टच्या बहाण्याने गाडीत बसवलं अन्...

३१ डिसेंबरची हाऊस पार्टी फ्लॉप? 'या' होम डिलिव्हरी ॲप्सचे कामगार संपावर; तुमच्या शहरात डिलिव्हरी चालू की बंद? जाणून घ्या सविस्तर