मुंबई

BMC Election : मुंबईचे महापौरपद भाजपकडे तर शिंदेंचा उपमहापौर? २८ जानेवारीला महापौरपदाची निवडणूक

मुंबईचा महापौर भाजपचा की ठाकरे यांच्या शिवसेनेचा यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली होती. अखेर मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे महायुतीतील मोठा भाऊ या नात्याने मुंबईच्या महापौरपदी त्यांचाच नगरसेवक बसणार हे निश्चित झाले आहे.

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीत भाजप मोठा भाऊ ठरला होता. त्यानंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीतही भाजपच मोठा भाऊ ठरल्याने मुंबईत भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तर शिंदे सेना दुसऱ्या नंबरवर असल्याने शिंदे सेनेचा उपमहापौर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे बंधूंना अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांना विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानावे लागणार आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौरपदासाठी निवडणूक २८ जानेवारीला होणार आहे.

मुंबईचा महापौर भाजपचा की ठाकरे यांच्या शिवसेनेचा यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली होती. अखेर मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे महायुतीतील मोठा भाऊ या नात्याने मुंबईच्या महापौरपदी त्यांचाच नगरसेवक बसणार हे निश्चित झाले आहे. मात्र, महापौरपदासाठी अद्यापपर्यंत आरक्षण काढण्यात न आल्यामुळे नेमकी महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे आरक्षणावर अवलंबून आहे. उपमहापौरपदासाठी कोणतेही आरक्षण नसल्यामुळे शिंदेंच्या वरिष्ठ नगरसेवकाला उपमहापौरपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

अन्य पदांचे असे होऊ शकते वाटप

मुंबई महानगरपालिकेतील अन्य महत्त्वाच्या पदाचे भाजप व शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाटप होणार आहे. यात भाजपला स्थायी समितीसह सुधार समिती या दोन महत्त्वाच्या वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदासह सभागृह नेतेपद मिळू शकते, तर शिंदेच्या शिवसेनेला बेस्ट समिती अध्यक्षपदासह शिक्षण समिती अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय आरोग्य, विधी, महिला बालकल्याण, बाजार उद्यान, स्थापत्य (शहर), स्थापत्य (उपनगर) या सहा विशेष समित्यांपैकी चार समित्या भाजपच्या वाट्याला, तर दोन समित्या शिवसेनेच्या मिळण्याची शक्यता आहे. १७ प्रभाग समित्यांमध्येही सर्वाधिक प्रभाग समिती अध्यक्षपद भाजपच्या वाट्याला जाणार आहे.

पहिल्यांदाच ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद

महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा असल्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेंचा नगरसेवक विराजमान होणार आहे.

BMC Election: मुंबई महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची यादी; एका क्लिकवर वाचा सर्व माहिती

BMC Election : मुंबईच्या चाव्या महायुतीकडे; महापालिका निसटली, उद्धव ठाकरेंनी दिली कडवी झुंज

Maharashtra Local Body Election Results : राज्यात भाजपच ‘मोठा’ भाऊ; २९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा कब्जा

Thane : स्वबळाचा नारा काँग्रेसच्या अंगलट; ६० उमेदवारांना ‘भोपळा’ही फोडता आला नाही

महानगरपालिका निवडणुकीत प्रचाराचा 'धुरळा'; मैदानापेक्षा सोशल मीडियावरच रंगला 'बॉस पॅटर्न'!