BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद? 
मुंबई

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?

मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदान सुरळीत व्हावे आणि मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी आज, १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून सर्व बँका, केंद्र व राज्य सरकारची कार्यालये बंद राहतील.

Krantee V. Kale

मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदान सुरळीत व्हावे आणि मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी आज, १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून सर्व बँका, केंद्र व राज्य सरकारची कार्यालये बंद राहतील.

काय बंद राहणार?

  • केंद्र व राज्य सरकारची कार्यालये

  • निमशासकीय कार्यालये

  • महामंडळे व मंडळे

  • सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU)

  • बँका

  • बीएमसी हद्दीतील केंद्र सरकारची कार्यालये

खासगी कार्यालये त्यांच्या अंतर्गत धोरणानुसार निर्णय घेतील; मात्र अनेक ठिकाणी सुट्टी राहण्याची शक्यता आहे.

शाळा आणि महाविद्यालये

  • महापालिकेच्या अखत्यारीतील सर्व आणि बहुतेक खाजगी शाळा व महाविद्यालये बंद. शाळा-महाविद्यालयांच्या अनेक इमारती मतदान केंद्र म्हणून वापरात.

शेअर बाजार

  • BSE आणि NSE या दोन्ही शेअर बाजारांना १५ जानेवारी रोजी पूर्ण सुट्टी

  • इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि ई-गोल्ड व्यवहार बंद

दारूबंदी (ड्राय डे)

  • १३ ते १६ जानेवारी या कालावधीत ४ दिवसांचा ड्राय डे

  • दारूची विक्री व सेवनास पूर्णतः बंदी

काय सुरू राहणार?

अत्यावश्यक सेवा:

  • रुग्णालये, रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन सेवा पूर्णतः कार्यरत

सार्वजनिक वाहतूक:

  • BEST बस, मुंबई लोकल रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा नेहमीप्रमाणे सुरू

  • मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे यासाठी अतिरिक्त व्यवस्था केली जाऊ शकते.

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

मतदानानंतर लगेच पुसली जाते बोटावरची शाई; मनसेच्या महिला उमेदवाराचा दावा; काँग्रेसच्या सचिन सावंतांनी तर प्रात्यक्षिकच दाखवलं - Video

BMC Elections 2026: 'व्होटर स्लिप्स'चा गोंधळ; अनेक मतदार मतदान न करताच परतले

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Election : राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटचे सर्व्हर डाऊन; मतदार यादीत नाव शोधण्यासाठी गोंधळ, सोशल मीडियावर संताप