मुंबई

BMC Mayor : ठाकरे सेनेकडून परतफेड! महापौरपदासाठी भाजपविरोधात उमेदवार नाही

मुंबई महापालिका २०१७ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे सेनेने महापौरपदासाठी उमेदवार दिला असता भाजपने विरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे चार दशकानंतर भाजपचा महापौर विराजमान होणार असून उद्धव ठाकरे यांनी विरोधाची तलवार म्यान करत उमेदवार रिंगणात न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : मुंबई महापालिका २०२६ च्या निवडणुकीत भाजप व शिंदेसेनेला बहुमत मिळाले असून भाजपच्या महापौर रितू तावडे ११ फेब्रुवारी रोजी महापौरपदाची धुरा हाती घेणार आहेत. २०१७ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे सेनेने महापौरपदासाठी उमेदवार दिला असता भाजपने विरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे चार दशकानंतर भाजपचा महापौर विराजमान होणार असून उद्धव ठाकरे यांनी विरोधाची तलवार म्यान करत उमेदवार रिंगणात न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २०१७ मध्ये भाजपने ठाकरेंवर केलेल्या कर्जाची परतफेड ठाकरे सेनेने केली आहे.

२०१७ च्या निवडणूक भाजप व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही स्वतंत्र लढवली होती. त्या निवडणुकीत ठाकरे सेनेला बहुमताचा आकडा गाठता आला होता. शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी ४ अपक्ष नगरसेवकांनी ठाकरेंना पाठिंबा दिला होता. तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते आणि २ अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपच्या नगरसेवकांचा आकडा ८४ वर गेला होता. त्यामुळे ठाकरे सेना २०१७ मध्ये मोठा भाऊ होता. त्यावेळी ठाकरे सेनेने महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवार उभे केले असता भाजपने विरोधात उमेदवार दिला नव्हता. तर आता ९ वर्षांनंतर झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप व शिंदेसेनेने बहुमताचा आकडा गाठला आहे.

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड