वाहतुकीवर १२ हजार CCTV कॅमेऱ्यांची नजर; बचाव पथके, हेल्पलाइन नंबर कार्यान्वित; BMC चा आपत्कालीन विभाग सज्ज  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

वाहतुकीवर १२ हजार CCTV कॅमेऱ्यांची नजर; बचाव पथके, हेल्पलाइन नंबर कार्यान्वित; BMC चा आपत्कालीन विभाग सज्ज

आपत्कालीन परिस्थितीत वेळीच मदत मिळावी, यासाठी बचाव पथके, हेल्पलाइन नंबर कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच पावसाळ्यात सखल भागात पाणी साचणे, वाहतूककोंडीवर तब्बल १२ हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. विशेष म्हणजे ५८ हॉटलाइन ‘व्ही सॅटेलाइट’ यंत्रणेच्या माध्यमातून कार्यरत करण्यात आल्या आहेत. एकूणच यंदाच्या पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज झाला आहे.

Swapnil S

मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकरांना वेळीच मदत मिळावी, यासाठी बचाव पथके, हेल्पलाइन नंबर कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच पावसाळ्यात सखल भागात पाणी साचणे, वाहतूककोंडीवर तब्बल १२ हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. विशेष म्हणजे ५८ हॉटलाइन ‘व्ही सॅटेलाइट’ यंत्रणेच्या माध्यमातून कार्यरत करण्यात आल्या आहेत. एकूणच यंदाच्या पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज झाला आहे.

पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेसह संबंधित यंत्रणा सज्ज झाली आहे. समुद्रकिनारी, चौपाट्यांवर पावसाळ्यात कुठलीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पर्यटकांच्या मदतीसाठी लाईफ गार्ड, अग्निशमन दलाच्या जवानांसह सहा रेस्क्यू बोट, ४२ लाईफ जॅकेट आदी तैनात असणार आहेत. कुलाबा, वरळी, मालाड, मानखुर्द आणि घाटकोपर येथे नौदलाची पूर बचाव पथके तयर ठेवली आहेत.

आणीबाणीप्रसंगी त्वरित मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तीन तुकड्या अंधेरी क्रीडा संकुल येथे तैनात आहेत, तर भारतीय लष्कराचे १०० कर्मचारी आणि जवानही सज्ज ठेवण्यात आले आहेत.

रडार लेव्हल ट्रान्समिटर

मुंबईतील नद्या आणि तलावातील पाण्याच्या पातळीतील वाढ़ कळवण्यासाठी रडार लेव्हल ट्रान्समिटर लावण्यात आलेले आहेत. पाणी पातळीच्या वाढीची माहिती या ट्रान्समिटरद्वारे थेट मुख्य नियंत्रण कक्षास प्राप्त होईल. सखल वस्तीत राहणाऱ्यांच्या त्वरित स्थलांतराकरिता याचा वापर होतो.

अशी आहे आपत्कालीन विभागाची सज्जता

  • अतिमहत्वाच्या ६१ ठिकाणांसह संबंधित अधिकाऱ्यांच्या वाहनांत अत्याधुनिक डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली

  • १९१६ मदतसेवा क्रमांकाच्या ३० लाइन्स तत्पर

  • शहर व उपनगरात पूरसदृश परिस्थितीप्रसंगी नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी एकूण २० जीवरक्षक तराफे

  • पाणी उपसा करणाऱ्या उदंचन पंपचालकांसोबत समन्वयासाठी कंत्राटदारांचे प्रतिनिधी नियंक्षण कक्षात तत्पर

  • डिझास्टर मॅनेजमेंट मुंबई महापालिका ॲप, संकेतस्थळ, ट्विटर हँन्डल,@mybmc, डिजिटल मोबाईल यंत्रणा उपलब्ध

  • महापालिकेच्या २६ वॉर्डमध्ये प्रत्येकी पाच शाळा तात्पुरते निवारे म्हणून घोषित

भूस्खलनाच्या ठिकाणी आपत्ती पथके तैनात

भूस्खलनाची शक्यता असणाऱ्या कुर्ला ‘एल’ वॉर्ड, ‘एन’ वॉर्ड घाटकोपर आणि भांडुप ‘एस’ वॉर्डकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या दोन तुकड्या १ जूनपासून तैनात करण्यात येणार आहेत. या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिकाना आपत्ती व्यवस्थापणाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर काय करावे आणि काय करू नये याचे माहिती फलक संभाव्य ठिकाणी लावण्यात येत आहेत.

धोकादायक ठिकाणांची रेकी

मुंबई अग्निशमन दल, नौदल, लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे अधिकारी व जवान संभाव्य पूर ठिकाणे, संभाव्य भूस्खलनाच्या ठिकाणांची आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची मान्सूनच्या आधी रेकी करणार आहेत.

मुंबईत मलेरिया, डेंग्यूचा धोका; ४२ हजार ठिकाणी सापडल्या मलेरिया, डेंग्यूच्या अळ्या; ३२ लाख ५१ हजार ६२३ घरांची तपासणी

Mumbai : मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात; पूल ३१ मेपर्यंत वाहतुकीसाठी सज्ज होण्याची शक्यता

Mumbai : दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राची प्रवेश प्रक्रिया सुरू; ३१ जुलैपर्यंत करता येणार ऑनलाइन अर्ज, दुहेरी पदवीचा पर्याय उपलब्ध

भाजप खासदारासाठी मुख्य सचिवांच्या ४१ बैठका

मुंबईत बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा; विना कागदपत्रांच्या आधारे वाटप