मुंबई महापालिका संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : उड्डाणपूल, भुयारी मार्ग, स्कायवॉकचे जाळे विस्तारणार; महापालिका सल्लागाराची नियुक्ती करणार

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिका पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, स्कायवॉक, पादचारी पुलाचे जाळे विस्तारणार आहे. प्रकल्प नियोजन व अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिका २९ सल्लागारांची नियुक्ती करणार आहे. या प्रस्तावावरून गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिका पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, स्कायवॉक, पादचारी पुलाचे जाळे विस्तारणार आहे. प्रकल्प नियोजन व अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिका २९ सल्लागारांची नियुक्ती करणार आहे. या प्रस्तावावरून गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेच्या हद्दीत विविध प्रकारचे उड्डाणपूल, पादचारी पूल, नाल्यावरील पूल, वाहनांसाठी भुयारी मार्ग, स्कायवॉक यांचे बांधकाम तसेच परिरक्षण हे पूल विभागामार्फत करण्यात येते. पुलांच्या बांधकामासाठी पुलाचा आराखडा, नियोजन, संकल्पचित्रे, अंदाजपत्रक व मसुदा निविदा बनविण्यासाठी सल्लागारांची आवश्यक्ता भासते. त्यामुळे पालिकेने या कामांसाठी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण सल्लागार शुल्काच्या ३० टक्के सल्लागारास दिले जाणार आहे.

मुंबई महापालिकेत सक्षम अभियंता असताना सल्लागारांची नियुक्ती यावरून यापूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी विरोध केला आहे.

नवीन सल्लागार पॅनेलवर ‘ही’ जबाबदारी

महापालिकेच्या मते, पाच वर्षांच्या कालावधीत, त्यातही पावसाळ्याचा विचार करून, पूल व इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन, आराखडे तयार करणे, व्यवहार्यता अहवाल, अंदाजपत्रके, निविदा कागदपत्रे आणि अंमलबजावणीदरम्यान आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन अखंडितपणे उपलब्ध व्हावे, यासाठी हे नवीन सल्लागार पॅनल तयार करण्यात येत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कर्जमाफीची अंतिम यादी लवकरच; प्राप्तिकर भरणाऱ्यांची माहिती मिळाल्यानंतरच यादी प्रसिद्ध होणार, पहिल्या टप्प्यात २५ लाख शेतकऱ्यांची नावे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शाही खानपान; खानपानावर प्रत्येक वर्षी ९ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च

Navi Mumbai : कर्तव्य संपले... पण माणुसकी नाही; रबाळे वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेशुद्ध कारचालकाला जीवदान

ठाण्यातील अग्निसुरक्षा धाब्यावर; शहरातील आकडेवारीने प्रशासनाची झोप उडाली

Sindhudurg : बांदावासीयांचा विरोध; शक्तिपीठ द्रूतगती महामार्गासाठी जमीन संपादनाविरोधात हरकती दाखल