मुंबई

BMC चा दणका! १,१८९ बांधकामांना कामबंद नोटीस; सेन्सर्स न बसवणे पडले महागात

काही बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी संबंधित आदेशांनुसार अत्यावश्यक असणारी ‘वायू गुणवत्ता मापन प्रणाली’ बसवली नसल्याचे समोर आले आहे.

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे/मुंबई

मुंबईतील हवेची गुणवत्ता स्थिर आहे की नाही हे तपासण्यासाठी बांधकाम ठिकाणी सेन्सर्स बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र मुंबई महापालिका प्रशासनाने २०२४ बांधकाम ठिकाणी पहाणी केली असता १,१८९ बांधकाम ठिकाणी सेन्सर्स बसवण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे १,१८९ बांधकाम ठिकाणी स्टॉपवर्क नोटीस बजावण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईतील हवा गेल्या काही वर्षांत खालावली असून प्रदूषणात वाढ होत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणी ‘एअर क्वालिटी सेन्सर्स’ कार्यान्वित करणे बंधनकारक केले आहे तसेच एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये ‘रेफरन्स ग्रेड एअर क्वालिटी मॉनिटर’ बसवण्याचे आदेश या आधीच देण्यात आले आहेत. मात्र, काही बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी संबंधित आदेशांनुसार अत्यावश्यक असणारी ‘वायू गुणवत्ता मापन प्रणाली’ बसवली नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने बांधकाम ठिकाणी पहाणी केली असता १,१८९ बांधकाम ठिकाणी सेन्सर्स बसवले नसल्याचे निदर्शनास येताच त्या प्रकल्पांना स्टॉपवर्क नोटीस बजावण्यात आल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

रस्ते धुलाईसाठी टँकरचा वापर दुप्पट!

प्रदूषण नियंत्रणासाठी धुळीचे कण हवेत पसरू नये, यासाठी रस्ते धुण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून केले जाते. सद्यस्थितीत ८४५ पाण्याच्या टँकरचा वापर केला जातो. मात्र, वाढते प्रदूषण लक्षात घेता टँकरचा वापर दुपटीने करण्यात येणार असल्याचे पालिकेचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे उपायुक्त अविनाश काटे यांनी सांगितले.

उल्लंघन करणारे पालिकेच्या रडारवर

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने प्रदूषणाचे नियमांचे उल्लंघन करणारे पालिका प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. प्रदूषण नियंत्रणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना स्टॉपवर्क नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापुढे ही नियमित पाहणी सुरू असून नियमभंग करणाऱ्या उर्वरित बांधकामांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

अशी झाली कारवाई

  • एकूण २,०२४ बांधकाम ठिकाण

  • १,१८९ बांधकामांना नोटीस

  • १,२५३ बांधकाम ठिकाण पालिकेच्या निरीक्षणात

Delhi Riots 2020 : गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा हत्येप्रकरणी माजी AAP नगरसेवक ताहीर हुसेनला जन्मठेप

Bhiwandi Building Collapse : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

August 2026 Dry Days : ऑगस्टमध्ये पार्टीचा प्लॅन करताय? 'या' २ दिवशी बंद राहणार दारूची दुकाने

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! जादा सामानासाठी आता रांगेत उभं राहायची गरज नाही; जाणून घ्या नवे नियम