कोस्टल रोड प्रकल्पातील बोगदा 'फायर प्रूफ'; 'वॉटर मिस्ट टर्बाइन' वाहन तैनात करणार; BMC करणार ६ कोटी ३२ लाख रुपये खर्च प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

कोस्टल रोड प्रकल्पातील बोगदा 'फायर प्रूफ'; 'वॉटर मिस्ट टर्बाइन' वाहन तैनात करणार; BMC करणार ६ कोटी ३२ लाख रुपये खर्च

कोस्टल रोडवरून दररोज हजारो लोक प्रवास करतात. कोस्टल रोडवर मरीन ड्राइव्ह ते वरळी व वरळी ते मरीन ड्राइव्ह असे दोन बोगदे असून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत याठिकाणी 'वॉटर मिस्ट टर्बाइन' वाहन तैनात करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ६ कोटी ३२ लाख ८०० रुपये खर्च करणार आहे.

Swapnil S

मुंबई : कोस्टल रोडवरून दररोज हजारो लोक प्रवास करतात. कोस्टल रोडवर मरीन ड्राइव्ह ते वरळी व वरळी ते मरीन ड्राइव्ह असे दोन बोगदे असून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत याठिकाणी 'वॉटर मिस्ट टर्बाइन' वाहन तैनात करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ६ कोटी ३२ लाख ८०० रुपये खर्च करणार आहे.

या वाहनाची बांधणी, पुरवठा, चाचणी व कार्यान्वतीकरण दोन वर्षाच्या हमी कालावधीसह खरेदी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. बुधवार, २४ जून रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

मुंबईतील जनतेच्या जीविताचे व संपत्तीचे आगीपासून व इतर दुर्घटनेपासून संरक्षण करण्याचे बंधनकारक कर्तव्य अग्निशमन दलामार्फत पार पाडले जाते. यासाठी मुंबई अग्निशमन दलात ३५ अग्निशमन केंद्रे, १९ लघु अग्निशमन केंद्रे व ३०० पेक्षा अधिक वाहनांचा ताफा असून यामध्ये विविध प्रकारची अग्निशमन व विमोचन वाहने आहेत.

मुंबई शहर हे भारताची आर्थिक राजधानी असल्यामुळे या शहराची गेल्या काही दशकांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. तसेच उत्तुंग इमारती, मॉल्स, मल्टीप्लेक्स इत्यादींच्या संख्येमध्ये लक्षणीय वृद्धी झाली आहे. जागेच्या कमतरतेमुळे मुंबई शहरामध्ये पायाभूत सुविधांचा विकास उभ्या स्वरूपामध्ये उत्तुंग इमारतींच्या माध्यमामधून घडत आहे. या उत्तुंग इमारतीमध्ये रुग्णालये, विविध प्रकारची वाणिज्य आस्थापने तसेच मोठ्या स्वरूपात वास्तव्याकरिता रहिवासी जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. मुंबई शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या कोस्टल रोडच्या बोगद्यात आपत्कालीन परिस्थितीत आग नियंत्रण व विमोचन कार्यासाठी तातडीने मदत उपलब्ध करण्याचे आव्हानात्मक कार्य अग्निशमन दलासमोर आहे.

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : विनापरवानगी चरासाठी शुल्क; चर खोदणे व पुनर्भरण सर्वसमावेशक धोरण-२०२६, युटीलिटी कामांसाठी डायमंड कटर बंधनकारक

Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

'कोबी'ला दोन रुपये किलो भाव; तीन एकर कोबीवर आधी मेंढ्या सोडल्या, नंतर रोटावेटर फिरवून उभे पीक केले नष्ट

Navi Mumbai : द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो! ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च