PM
मुंबई

मुंबईत मोकाट गुराढोरांचा उपद्रव ;बंदोबस्तासाठी पालिका अॅक्शनमोडमध्ये

Swapnil S

मुंबई : रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुराढोरांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या देवनार येथील पशुवधगृहाच्या माध्यमातून मोकाट गुरे-ढोरे जप्त करण्यात येतात. गेल्या पाच वर्षांत साडेतीन हजारांहून अधिक गुरे-ढोरे जप्त करण्यात आले असून, संबंधित मालकाकडून ८८ लाख ३० हजार ८२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत तब्बल ९९ गुराढोरांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत एकीकडे भटक्या कुत्र्यांची दहशत कायम असताना मोकाट गुराढोरांचा उपद्रव वाढला आहे. मालिकांच्या दुर्लक्षामुळे मोकाट गुरे-ढोरे रस्त्यावर कुठेही फिरतात आणि यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. तसेच रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या ठोकर मारण्याचा धोका असतो. मोकाट गुराढोरांचा उपद्रव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या देवनार येथील पशुवधगृहाच्या माध्यमातून जप्तीची कारवाई करण्यात येते.

साडेतीन हजारांहून अधिक गुरेढोरे जप्त

२०१८ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत साडेतीन हजारांहून अधिक गुरेढोरे जप्त करण्यात आली असून, मालकांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर दोन हजार २६५ गुरेढोरे परत करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर ९८७ गुरेढोरे आपली असल्याचा दावा कोणाही मालकाने केला नसल्याने जीवदया संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त