मुंबई

गोवंडीतून बोगस मुन्नाभाईला अटक ;क्लिनिक उघडून रुग्णांवर उपचार करत असल्याचे उघड

नवशक्ती Web Desk

मुंबई : गोवंडीतील बोगस मुन्नाभाई डॉक्टरचा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अल्ताफ हुसैन मोहम्मद निजाम खान असे या बोगस डॉक्टरचे नाव असून त्याने स्वतचे क्लिनिक उघडून रुग्णांवर उपचार सुरु केल्याचे उघडकीस आले आहे.

कुठल्याही वैद्यकीय पदवीसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी नसतानाही गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात अल्ताफ हुसैन खान याने स्वतचे क्लिनिक थाटले होते. याच क्लिनिकमध्ये तो रुग्णांवर उपचार करून त्यांच्याकडून भरमसाठी फी आकारत होता. ही माहिती प्राप्त होताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी अल्ताफच्या क्लिनिकमध्ये कारवाई केली होती. त्याच्याकडे त्याच्या वैद्यकीय पदवीसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणीची कागदपत्रे मागण्यात आली. मात्र त्याच्याकडे कुठलीही कागदपत्रे नव्हती. तो बोगस डॉक्टर असल्याचे उघडकीस आले.

त्याच्या क्लिनिकमधून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध भादवीसह महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याचा ताबा शिवाजीनगर पोलिसांकडे सोपविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस