मुंबई उच्च न्यायालय संग्रहित छायाचित्र
मुंबई

साक्षीदारांचे निवेदन 'कॉपी-पेस्ट'! मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी

गंभीर गुन्ह्यांच्या आरोपपत्रांतही तपास अधिकारी साक्षीदारांची निवेदने कॉपी-पेस्ट करत असल्याच्या प्रकारावर नाराजी व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : गंभीर गुन्ह्यांच्या आरोपपत्रांतही तपास अधिकारी साक्षीदारांची निवेदने कॉपी-पेस्ट करत असल्याच्या प्रकारावर नाराजी व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

एका फौजदारी प्रकरणातील याचिका ऐकताना, औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि संजय देशमुख यांनी निरीक्षण नोंदवले की, आरोपपत्रात पुनरुत्पादित केलेली साक्षीदारांची निवेदने इतकी एकसारखी आहेत की परिच्छेददेखील त्याच शब्दांनी सुरू होतात आणि त्याच शब्दांनी संपतात.

गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील पोलिस अशाप्रकारे शॉर्टकट घेत असतील, तर हा गुन्हे न्याय व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय आहे, असे न्यायालयाने म्हटले.

अशा प्रकारच्या कॉपी-पेस्ट निवेदनांमागे तपास अधिकाऱ्यांना कोणती अडचण येते, हे शोधण्याची आणि त्या त्रुटींचा स्वतःहून (suo motu) विचार करण्याची हीच वेळ आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने राज्य सरकारला तपास अधिकाऱ्यांनी साक्षीदारांचे निवेदन कसे नोंदवावे याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आदेश दिले.

Mumbai : रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; धार्मिक उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही - हायकोर्ट

आता भिक्षामुक्त समाज करा !

आजचे राशिभविष्य, २३ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

जास्वंदीचं तेल केसांसाठी का मानलं जातं खास? जाणून घ्या फायदे

कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवायची आहे? ट्राय करा या २ सोप्या पद्धती