संग्रहित छायाचित्र 
मुंबई

छोटा राजनला जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन मंजूर, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती; पण तुरुंगातच राहणार!

गँगस्टर छोटा राजन याला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत २००१ मधील हॉटेल व्यवसायी जया शेट्टी हत्येप्रकरणी त्याची जन्मठेपेची शिक्षा स्थगित केली आणि जामीन मंजूर केला.

Swapnil S

मुंबई : गँगस्टर छोटा राजन याला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत २००१ मधील हॉटेल व्यवसायी जया शेट्टी हत्येप्रकरणी त्याची जन्मठेपेची शिक्षा स्थगित केली आणि जामीन मंजूर केला. जामिन मंजूर झाला असला तरी छोटा राजनला अन्य गुन्हेगारी खटल्यांमध्ये तुरुंगातच राहावे लागणार आहे.

या वर्षी मे महिन्यातच विशेष न्यायालयाने राजनला जया शेट्टी हत्या प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात राजनने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. शिक्षेला स्थगिती मिळावी आणि त्याला अंतरिम जामीन मिळावा, अशी मागणी त्याने केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने राजनला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

मध्य मुंबईतील गोल्डन क्राऊन हॉटेल हे जया शेट्टी यांच्या मालकीचं होतं. छोटा राजन टोळीने त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. त्यास नकार दिल्यामुळे ४ मे २००१ रोजी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर राजनच्या टोळीतील दोन कथित सदस्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. छोटा राजन टोळीचा सदस्य हेमंत पुजारी याच्याकडून शेट्टीला खंडणीचे कॉल आले होते आणि पैसे न दिल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. ज्येष्ठ क्राइम रिपोर्टर जेडे यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला राजन सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात बंद आहे.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे