Mumbai : कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचे संकेत 
मुंबई

Mumbai : कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचे संकेत

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी शनिवारी कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडची दोन तास आकस्मिक पाहणी केल्यानंतर तेथील भीषण दुर्गंधीची गंभीर दखल घेतली आहे.

Swapnil S

देवश्री भुजबळ/मुंबई

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी शनिवारी कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडची दोन तास आकस्मिक पाहणी केल्यानंतर तेथील भीषण दुर्गंधीची गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, डंपिंग ग्राऊंडमधील मिथेन वायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी व रहिवाशांना दिलासा देण्यासाठी काय पावले उचलली, याची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र मुंबई पालिका सोमवारी न्यायालयात सादर करणार आहे.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने प्रशासनाच्या ‘कॅज्युअल’ दृष्टिकोनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. प्रदूषण आणि घातक उत्सर्जनावर तातडीने उपाययोजना न केल्यास कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचे आदेश देऊ, असा इशारा न्यायालयाने सरकार व पालिकेला दिला आहे. दरम्यान, ‘यूसीएएलए’च्या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक मिथेन उत्सर्जन करणाऱ्या २५ डंपिंग ग्राऊंडच्या यादीत कांजूरमार्ग १२ व्या क्रमांकावर आहे. डंपिंग ग्राऊंड रहिवासी क्षेत्रापासून किमान ५ किमी लांब असावे, या नियमाकडे दुर्लक्ष होत आहे, असे याचिकाकर्ते सतीश येवले यांनी सांगितले.

NEET पुनर्परीक्षेपूर्वी Telegram वरील बंदी कायम; दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

उरण तालुक्यात भीषण पाणीटंचाई; रानसई आणि पुनाडे धरणांनी गाठला तळ, अनेक गावांना १२ ते १५ दिवसांआड पाणी

Kalyan-Dombivli : अतिधोकादायक इमारतीतच KDMC चा आपत्कालीन कक्ष; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Pune : धरणांत १४ टक्के पाणीसाठा; पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे हाल होणार

सायबांच्या वाहनांना रेड कार्पेट! ब्रिटनच्या वाहनांना भारतात सवलत