संग्रहित छायाचित्र  एक्स @MASTinsan
मुंबई

कबुतरांना खाद्य घातल्यास गुन्हे दाखल करा; उच्च न्यायालयाचे आदेश

दादर येथील कबुतरखान्यात पक्ष्यांना खाद्य घालण्यास मनाई केली असताना खाद्य कसे घातले जाते असा संतप्त सवाल उपस्थित करत न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी पालिका प्रशासनाला जाब विचारला. याला आळा घालण्यासाठी आणि कायद्याची जरब बसविण्यासाठी संबंधितांवर गुन्हे दाखल करा असे आदेशच पालिकेला दिले.

Swapnil S

मुंबई : दादर येथील कबुतरखान्यात पक्ष्यांना खाद्य घालण्यास मनाई केली असताना खाद्य कसे घातले जाते असा संतप्त सवाल उपस्थित करताना न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने कबुतरांची पिसे, विष्ठा मानवी आरोग्यास धोकादायक असतानाही लोकांनी न्यायालयीन आदेश धुडकावत कबुतरांना खाद्य घातलेच कसे जावू शकते असा जाब पालिका प्रशासनाला विचारला. याला आळा घालण्यासाठी आणि कायद्याची जरब बसविण्यासाठी संबंधितांवर गुन्हे दाखल करा असे आदेशच पालिकेला दिले.

कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे कारण देत पालिकेला शहरातील कबुतरखाना बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले होते. मात्र कबुतरांना खायला घालण्यास बंदी घातल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याने खाद्य घालण्यापासून रोखू नये अशी मागणी करत पल्लवी पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी बंदी असतानाही कबुतरांना खाद्य दिले जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. खंडपीठाने याची गंभीर दखल घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच संबंधितांवर बीएनएस कायद्याअंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पालिकेच्या वतीने ॲड. रुपाली अधाते यांनी तर राज्य सरकारच्या वतीने अॅड. मानकुवर देशमुख यांनी बाजू मांडली. दरम्यान न्यायालयाने दिलेले अंतरिम आदेश कायम ठेवत फौजदारी कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले व सुनावणी ७ ऑगस्टपर्यंत तहकूब ठेवली.

न्यायालय म्हणते

  • कबुतरखान्यातील कबुतरांच्या समूहामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. असे असतानाही काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे कबुतरांना खाद्य देणे सुरू ठेवले आहे.

  • कबुतरांचा त्रास होणार नाही, याची पालिकेने काळजी घ्यावी.

  • न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तसेच जीवघेणा

  • आजार पसरवण्यास हातभार लावणाऱ्या नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करा.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती