MIDC युनिटवर मालमत्ता कर नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल 
मुंबई

MIDC युनिटवर मालमत्ता कर नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने भाडेतत्त्वावर दिलेल्या भूखंडांवर बदलापूर औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या औद्योगिक युनिट्सकडून कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेने केलेली मालमत्ता कराची मागणी टिकू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने भाडेतत्त्वावर दिलेल्या भूखंडांवर बदलापूर औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या औद्योगिक युनिट्सकडून कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेने केलेली मालमत्ता कराची मागणी टिकू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

एमआयडीसीकडून सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना आणि त्यासाठी सेवा शुल्क आकारले जात असताना, नगरपरिषदेने स्वतंत्रपणे मालमत्ता कर आकारण्यासाठी एमआयडीसीसोबत कोणतीही व्यवस्था किंवा करार केलेला नसल्यास अशी मागणी करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्या. जी. एस. कुलकर्णी आणि न्या. आरती साठे यांच्या खंडपीठाने ५ ऑगस्ट रोजी हा निकाल दिला. यासोबतच २०२६ मधील अवमान याचिकेचाही न्यायालयाने निपटारा केला.

उच्च न्यायालयाने नमूद केले की, एमआयडीसी पायाभूत सुविधा पुरवत असेल आणि त्यासाठी सेवा शुल्क वसूल करत असेल, तर एमआयडीसी तसेच त्याच्या भूखंडधारकांना मालमत्ता करातून सूट राहते. मात्र, या सुविधांची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे सोपविल्यास परिस्थिती बदलू शकते. या निर्णयामुळे राज्यातील एमआयडीसी क्षेत्रांमध्ये कार्यरत औद्योगिक युनिट्सना मोठा दिलासा मिळाला आहे.

बदलापूर एमआयडीसी परिसरातील औद्योगिक युनिट्ससाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

Mumbai : लोअर परळच्या देवीमूर्तीचा भव्य थाट; लालबागच्या राजाच्या सिंहासनाची खास झलक व्हायरल