...तर 'त्या' मुलीला संपूर्ण मालमत्ता देणारे 'मृत्युपत्र' वैध; उच्च न्यायालयाने मुलाचे दावे फेटाळले 
मुंबई

...तर 'त्या' मुलीला संपूर्ण मालमत्ता देणारे 'मृत्युपत्र' वैध; उच्च न्यायालयाने मुलाचे दावे फेटाळले

जन्मदात्या वडिलांची शेवटच्या श्वासापर्यंत काळजी घेणाऱ्या मुलीला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला.

Swapnil S

मुंबई : जन्मदात्या वडिलांची शेवटच्या श्वासापर्यंत काळजी घेणाऱ्या मुलीला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. वडिलांनी मुलीला संपूर्ण मालमत्ता देत बनवलेले मृत्युपत्र न्या. सारंग कोतवाल आणि न्या. रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने वैध ठरवले. या मृत्युपत्राद्वारे वडिलांनी मुलाला मालमत्तेतून पूर्णपणे बेदखल केले होते. त्याआधारे न्यायालयाने मुलाचे दावे फेटाळले.

मुंबईच्या नेपिअन सी रोड येथील रहिवासी तारापदा चॅटर्जी यांचे २४ ऑगस्ट १९९० रोजी निधन झाले. त्यांनी २१ मार्च १९८९ रोजी आपले शेवटचे मृत्युपत्र तयार केले होते. या मृत्युपत्रात त्यांनी आपली मुलगी शांता चॅटर्जी हिच्या नावावर संपूर्ण मालमत्ता केली व मुलाचे नावही घेतले नव्हते.

मुलाने व त्याच्या कायदेशीर वारसांनी मृत्युपत्राला आव्हान दिले होते. वडिलांच्या स्वाक्षरीमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आणि ते मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचा आरोप मुलाच्या वतीने करण्यात आला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

जेन-झीला घाबरून सरकारची आणीबाणी; संपूर्ण देशच बंद करून टाका; CJP चा केंद्रावर हल्ला

माशी मारण्यासाठी हातोड्याचा वापर नको; सर्व काही ठप्प करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

इंडिया आघाडीचे नेते भेटले राष्ट्रपतींना, मतचोरीचा मुर्मू यांनी इन्कार केला नाही - राहुल गांधी

'एसटी'च्या भूखंडांवर व्यावसायिक इमले; प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निविदा बंधनकारक