धर्मांतरासाठी विद्यार्थ्याला धमकी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 
मुंबई

Mumbai : धर्मांतरासाठी विद्यार्थ्याला धमकी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बोरिवली (पूर्व) येथे कराटेच्या क्लासला जात असलेल्या १८ वर्षांच्या विद्यार्थ्याला भररस्त्यात थांबवून धर्मांतरासाठी त्याच्यावर दबाब आणल्याच्या आरोपावरून तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : बोरिवली (पूर्व) येथे कराटेच्या क्लासला जात असलेल्या १८ वर्षांच्या विद्यार्थ्याला भररस्त्यात थांबवून धर्मांतरासाठी त्याच्यावर दबाब आणल्याच्या आरोपावरून तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्रनगर येथील गोल्डन मैदानाजवळून हा विद्यार्थी कराटे क्लासला पायी जात असता एका महिलेसह तिघा जणांनी त्याला अडवून त्याचा धर्म कोणता आहे, अशी विचारणा केली आणि त्याच्या धर्माबद्दल अपशब्द काढले.

त्यानंतर तिघांनी त्याला धर्मांतरण करण्यासाठी सुचवून त्यासाठी आमीषही दाखवले. विद्यार्थ्याने त्यास नकार देत ती बाब त्याच्या कराटे क्लासच्या शिक्षकांना सांगितली. ही बाब भाजपच्या बोरिवली विधानसभा सचिव ॲड. सीमा शिंदे यांना समजताच त्यांनी त्या दोघांसह कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसात तक्रार दाखल केली.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली