प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

'क्रेडिट'वर ८.५ कोटींचे हिरे घेऊन दलाल फरार, गुन्हा दाखल; अटकेसाठी पोलिसांची विशेष मोहिम

Swapnil S

मुंबई : साडेआठ कोटीच्या हिऱ्यांच्या अपहारप्रकरणी एका हिरे दलालाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. मेहुल सतीश झव्हेरी असे या दलालाचे नाव असून, तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

यातील तक्रारदार हिरे व्यापारी असून, त्यांचा वांद्रे, बीकेसी, भारत डायमंड बोर्स येथे हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. मेहुल हा त्यांच्या परिचित हिरे दलाल असून, ते त्याला गेल्या चौदा वर्षांपासून ओळखतात. त्याने त्यांच्याकडून अनेकदा हिरे घेऊन त्याची विक्री करून पेमेंट केले होते. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. जानेवारी २०२४ रोजी मेहुल हा त्यांच्या कार्यालयात आला होता. त्याने ग्राहकांना विक्रीसाठी त्यांच्याकडून सुमारे पावणेदोन कोटीचे हिरे घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हिरे आणि हिऱ्यांच्या विक्रीतून आलेले पेमेंट जमा केले नाही. याच दरम्यान मेहुलने त्यांच्यसह भारत डायमंड बोर्समधील इतर सात हिरे व्यापाऱ्याकडून क्रेडिटवर विक्रीसाठी हिरे घेतले होते. या सर्वांकडून त्याने ८ कोटी ६८ लाख रुपयांचे हिरे घेतले होते.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त