X-@ @AshwiniVaishnaw
मुंबई

बुलेट ट्रेनचे काम वेगात! बीकेसी स्थानकाचे ७६ टक्के खोदकाम पूर्ण - अश्विनी वैष्णव

मुंबई : बीकेसी (बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स) येथे उभारण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मुंबईतील पहिल्या स्थानकाचे काम वेगाने सुरू असून स्थानकाच्या ७६ टक्के खोदकाम पूर्ण झाले असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी येथे दिली.

Swapnil S

मुंबई : बीकेसी (बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स) येथे उभारण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मुंबईतील पहिल्या स्थानकाचे काम वेगाने सुरू असून स्थानकाच्या ७६ टक्के खोदकाम पूर्ण झाले असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी येथे दिली.

वैष्णव यांनी मुंबईतील बीकेसी येथील बांधकामाधीन भुयारी स्थानकाला भेट देऊन तेथील प्रत्यक्ष प्रगतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी, तसेच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

५०० किमीहून अधिक लांबीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प २०२८ पर्यंत कार्यान्वित होईल.

वैष्णव म्हणाले की, बी३ बेसमेंटचा तळ आणि स्थानकाच्या भिंतींना मजबुती देण्याचे काम पूर्ण झाले आहे.

बीकेसी येथील बुलेट ट्रेनच्या उगम स्थानकाचे काम वेगात सुरू आहे. स्थानकाच्या भिंतींचे काम सुरू झाले असून बोगद्याचे कामही जलद गतीने सुरू आहे, असेही ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, शिळफाट्याच्या (डोंबिवली) पलीकडील बोगद्याच्या भागानंतर महाराष्ट्रातील सर्व कामे भू-संपादन झाल्यानंतर जलद गतीने सुरू आहेत.

बीकेसी स्थानकावर एक बहुमजली रचना उभारण्यात येणार आहे. बी१ ते बी३ स्तरांवर ऑपरेशनल क्षेत्र असतील. बी३ स्तर हा ट्रेन पार्किंगसाठी असेल, बी२ वर ऑपरेशनल फंक्शन्स असतील आणि बी१ व ग्राउंड लेव्हलवर प्रवाशांसाठी व्यवस्था असेल.

बुलेट ट्रेनमधील हे जागतिक दर्जाचे स्थानक उभारण्याचे काम सुरू असल्याचेही वैष्णव यांनी सांगितले.

एकूण खर्च १.०८ कोटी

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्पाचा एकूण खर्च १.०८ लाख कोटी रुपये आहे. भागभांडवलाच्या व्यवस्थेनुसार, भारत सरकार १० हजार कोटी रुपये योगदान देणार असून गुजरात आणि महाराष्ट्र राज्ये प्रत्येकी ५ हजार कोटी रुपये देईल. तर उर्वरित निधी जपानकडून ०.१ टक्के व्याजदराने घेतलेल्या कर्जातून दिला जाईल.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री