मुंबई

फसवणुकीच्या गुन्ह्यांतील व्यावसायिकाला अटक

तीन महिन्यानंतर ओशिवरा पोलिसांनी केली अटक

नवशक्ती Web Desk

मुंबई : फसवणुकीच्या गुन्ह्यांत गेल्या तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या सोहन रामबाबू रॉय नावाच्या एका व्यावसायिकाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत त्याची पत्नी सीमा रॉय ही पाहिजे आरोपी असून तिचा पोलिसाकडून शोध सुरू आहे. या दोघांवर एका व्यावसायिकाकडून घेतलेल्या मालाचे पेमेंट न करता फसवणूक केल्याचा आरोप आहे. जोगेश्वरीत राहणाऱ्या तक्रारदाराला आदिती इंडस्ट्रिज कंपनीचे मालक सोहन आणि सीमा यांनी मालाची ऑर्डर दिली होती. जुलै ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत त्यांनी १३.५० लाखांच्या मालाची डिलिव्हरी या दोघांना केली होती. त्यापैकी १ लाख २० हजार रुपये सोहन आणि सीमा यांनी दिले होते. उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करणे तसेच धमकी देणे, यामुळे तक्रारदाराने सोहन आणि सीमा रॉय यांच्याविरुद्ध ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर फरार झालेल्या सोहन रॉयला तीन महिन्यानंतर ओशिवरा पोलिसांनी अटक केली.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली