मुंबई

मनसेला आव्हान देणाऱ्या व्यावसायिकाची सुरक्षेची मागणी

मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसेनेचे राज ठाकरे यांना आव्हान दिल्याबद्दल धमक्या मिळाल्यानंतर एका गुंतवणूक सेवेच्या संस्थापकाने संरक्षणासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. मनसे प्रमुखांच्या गैरवर्तनाचा निषेध म्हणून मी मराठी शिकणार नाही, असे गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी म्हटले आहे.

Swapnil S

मुंबई : मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसेनेचे राज ठाकरे यांना आव्हान दिल्याबद्दल धमक्या मिळाल्यानंतर एका गुंतवणूक सेवेच्या संस्थापकाने संरक्षणासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. मनसे प्रमुखांच्या गैरवर्तनाचा निषेध म्हणून मी मराठी शिकणार नाही, असे गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी म्हटले आहे.

मुंबईत ३० वर्षे राहूनही मला मराठी नीट येत नाही आणि तुमच्या गैरवर्तनामुळे मी असा निर्धार केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी दिली जात नाही तोपर्यंत मी प्रतिज्ञा घेणार नाही, असे केडिया यांनी एक्सवर पोस्ट केले आहे. मनसे नेते संदीप यांच्या ट्विटनंतर, केडिया यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि दावा केला की त्यांना त्यांच्या सोशल मीडिया पोस्टसाठी धमक्या मिळत आहेत. केडिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांना टॅग केल्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. केडिया यांनी शुक्रवारी आणखी एक संदेश पोस्ट केला.

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल