File Photo 
मुंबई

अंधेरीतील साची बारमधील छमछमचा पर्दाफाश; १८ गायिकांची आणि बारबालांची सुटका

Swapnil S

मुंबई : मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून अंधेरीतील साची बारमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या छमछमचा गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी बारचा मालक, मॅनेजरसह ३१ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत गायिका असलेल्या १८ बारबालांची सुटका करण्यात आली आहे.

ताब्यात घेतलेल्या सर्वांना नंतर अंधेरी पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. या कारवाईमुळे शहरातील बार मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अंधेरीतील सहार रोडवरील सिगारेट फॅक्टरीसमोरील चकाला व्हिलेजमध्ये साची (रत्नमहल) नावाचे एक बार अँड रेस्टॉरंट आहे. या बारमध्ये रात्री उशिरापर्यंत बारबालांना ग्राहकांसमोर बॉलीवूड गाण्यांवर अश्‍लील नृत्य करण्यास प्रवृत्त केले जाते. मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री अचानक छापा टाकला, यावेळी तिथे असलेल्या ग्राहकांसमोरच काही बारबाला अश्‍लील नृत्य करताना दिसून आल्या.

या कारवाईत पोलिसांनी बारचा मालक, मॅनेजर, कॅशिअर, नऊ स्टीवर्ड-वेटर, चार ऑर्केस्ट्रा कलाकार आणि १५ ग्राहकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी १८ बारबालांची सुटका केली. गायिका म्हणून काम करणाऱ्या या तरुणींना ग्राहकांसोबत अश्लील नृत्य करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे उघडकीस आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस