FPJ
मुंबई

Prabhadevi: प्रभादेवीत रस्ता खचला

प्रभादेवी पश्चिमेतील किस्मत टॉकीजजवळील रस्ता गुरुवारी दुपारच्या सुमारास खचला. या खचलेल्या रस्त्यात एक चारचाकी वाहन अडकले होते.

Swapnil S

मुंबई : प्रभादेवी पश्चिमेतील किस्मत टॉकीजजवळील रस्ता गुरुवारी दुपारच्या सुमारास खचला. या खचलेल्या रस्त्यात एक चारचाकी वाहन अडकले होते.

वाहतूक नियंत्रण कक्षातून दिलेल्या माहितीनुसार, प्रभादेवीतील वीर सावरकर मार्गावरील किस्मत टॉकीजजवळच्या रस्त्यावर खड्डा तयार झाला. या खड्ड्यात एका कारची चारही चाके अडकली. दुपारी पावणेबाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे काही वेळ या रस्त्यावरील वाहने थांबली होती.

वाहतूक नियंत्रण शाखेतून माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या विभाग कार्यालयाचे तसेच रस्ते विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्या आधीच वाहतूक पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने खड्ड्यात अडकलेले वाहन बाहेर काढले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे