मुंबई

कर्नाक रेल्वे उड्डाणपूल १० जूनपर्यंत खुला करावा; अतिरिक्त आयुक्तांचा कंत्राटदार, स्थानिक अधिकाऱ्यांना आदेश

कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे काम १० जूनपर्यंत पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करावा.

Swapnil S

मुंबई : कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे काम दिनांक १० जून पर्यंत पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करावा. तसेच उर्वरीत कामे पुढील ५३ दिवसांत पूर्ण करण्यासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी कंत्राटदार आणि स्थानिक अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला.

लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. रेल्‍वे मार्गावर तुळई स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण झाल्‍यानंतर पुढील कामकाजाचे सूक्ष्‍म नियोजन करून टप्‍पानिहाय किती कालावधी लागेल, याची निश्चिती महानगरपालिकेच्‍या पूल विभागामार्फत करण्‍यात आली आहे.

दरम्यान कर्नाक उड्डाणपूल १० जूनपर्यंत वाहतुकीस खुला करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. पूर्व दिशेकडील कामे अद्याप बाकी आहेत. यासाठी सर्व लोखंडी तुळया २७ एप्रिलपर्यंत प्रकल्पस्थळी उपलब्ध करू. २ मेपर्यंत तुळया स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण करून ५ जून २०२५ पर्यंत दोन्ही बाजूंचे पोहोच रस्ते तयार करण्याचे निर्देश बांगर यांनी दिली. तसेच ७ मे पर्यंत रेल्वे भागातील काँक्रिटीकरण करून १० जून पर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली