सोमेंद्र शर्मा / मुंबई
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) संरक्षण लेखा प्रधान नियंत्रकच्या (पीसीडीए) दोन अधिकाऱ्यांवर २०२२-२३ ते २०२४-२५ या काळात बॅटऱ्या, यूपीएस आणि हाय-एंड सर्व्हर्सच्या खरेदीतील अनियमिततेप्रकरणी सरकारचे ५० लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.
पीसीडीए, पुणे येथील सतर्कता अधिकाऱ्याकडून कार्यरत दोन अधिकारी आणि इतरांविरुद्ध लेखी तक्रार प्राप्त झाली होती. आरोपींनी
पीसीडीएशी व्यवहार करणाऱ्या कंत्राटदारांकडून अवाजवी फायदा मिळवण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे.
या कटाचा भाग म्हणून, आरोपी लोकसेवकांनी एका खासगी मध्यस्थ व्यक्तीद्वारे कंत्राटदारांकडून लाचेची रक्कम गोळा करून ती स्वतःपर्यंत पोहोचवण्यासाठी बेकायदेशीर लाभ (लाच) मिळवला.