कल्याण-इगतपुरी मार्गावर १३ तासांचा मेगाब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक 
मुंबई

Mumbai : कल्याण-इगतपुरी मार्गावर १३ तासांचा मेगाब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

मध्य रेल्वेकडून कल्याण-इगतपुरी मार्गावर ६ जून रोजी १३ तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द, मार्ग बदलून धावणार किंवा वेळेत बदल करण्यात येणार आहेत.

Mayuri Gawade

मध्य रेल्वेने कल्याण-इगतपुरी मार्गावरील आटगाव स्थानकाजवळ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यासाठी १३ तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक ६ जून रोजी दुपारी २ वाजल्यापासून ७ जून रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

या कालावधीत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द, मार्ग बदलून धावणार, वेळेत बदल करण्यात येणार किंवा काही गाड्या अर्ध्या मार्गावरच थांबवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

६ जून रोजी खालील गाड्या रद्द राहणार आहेत :

  • गाडी क्रमांक ११०११ CSMT - धुळे एक्स्प्रेस

  • गाडी क्रमांक ११०१२ धुळे - CSMT एक्स्प्रेस

  • गाडी क्रमांक १२१०९ CSMT - मनमाड एक्स्प्रेस

  • गाडी क्रमांक १२११० मनमाड - CSMT एक्स्प्रेस

मार्ग बदलून धावणाऱ्या गाड्या

कल्याण, कर्जत, पुणे, मनमाड, दौंड आणि कुर्डुवाडी मार्गे काही गाड्या वळवण्यात येणार आहेत.

त्यामध्ये :

  • ११०७१ लोकमान्य टिळक टर्मिनस - बलिया

  • ०१०२७ दादर - गोरखपूर

  • १५०६६ पनवेल - गोरखपूर

  • ११००१ CSMT - बल्लारशाह

  • १२१३१ दादर - साईनगर शिर्डी

  • १७०५७ CSMT - लिंगमपल्ली

या गाड्यांचा समावेश आहे.

वेळेत बदल करण्यात आलेल्या गाड्या

६ जून रोजी :

  • १२८०९ CSMT - हावडा

  • १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस - शालीमार

  • १२३२२ CSMT - हावडा

  • ०१०७९ CSMT - गोरखपूर

  • १२१६७ लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी

  • ११०५७ CSMT - अमृतसर

  • १२१४१ लोकमान्य टिळक टर्मिनस - पाटलीपुत्र

७ जून रोजी :

  • १२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस - हटिया

  • २२१७७ CSMT - वाराणसी

  • ०२१४१ CSMT - नागपूर

  • २२५३८ गोरखपूर - CSMT

अर्ध्या मार्गावर थांबवण्यात येणाऱ्या गाड्या

  • १२०७२ हिंगोली डेक्कन – CSMT एक्स्प्रेस नाशिकपर्यंतच धावणार

  • १७६११ नांदेड – CSMT एक्स्प्रेस मनमाडपर्यंतच धावणार

  • १२०७१ CSMT – हिंगोली डेक्कन एक्स्प्रेस नाशिकहून सुटणार

  • १७६११ CSMT – नांदेड एक्स्प्रेस मनमाडहून सुटणार

प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाड्यांची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करावा, असं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या घाऊक बदल्या; कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

फुफ्फुसात अडकलेला एलईडी बल्ब काढत ९ महिन्यांच्या बाळाचे वाचवले प्राण ; पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूटमधील डॉक्टरांची कामगिरी

इबोलाच्या धोक्यामुळे मुंबई पालिका अलर्ट मोडवर; निवासी डॉक्टरांना मार्गदर्शक सूचना जारी

मुंबईतील १० जिमखान्यांची होणार काटेकोर तपासणी; शासकीय जमिनीवरील जिमखान्यांच्या भाडेकरारासंदर्भात मोहीम

रस्ते अपघातातील जखमींसाठी 'एअर ॲम्ब्युलन्स' सेवा; परिवहन विभागाचा उच्चाधिकार समितीला प्रस्ताव