मुंबई : मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेतला आहे. मुख्य मार्गावर विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ५ व्या आणि ६व्या मार्गिकेवर सकाळी ८ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे, तर ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी, नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.
ब्लॉक कालावधीत डाऊन मेल, एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गिकेवर वळवल्या जातील आणि ठाणे स्थानकावर पुन्हा ५व्या मार्गिकेवर वळवल्या जातील.
ठाणे आणि वाशी, नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत ठाणे आणि वाशी,नेरुळ,पनवेल दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा ब्लॉक नाही
रुळांची देखभाल, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी, वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान शनिवारी मध्यरात्री (ता. १८ जुलै) 'जंबो ब्लॉक' घेण्यात येणार आहे. हा जंबो ब्लॉक १८ जुलै रोजी रात्री ११.५५ वाजल्यापासून १९ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजेपर्यंत ‘अप’ आणि 'डाऊन' जलद मार्गांवर घेतला जाईल. या ब्लॉकमुळे, विरारहून पहाटे ४.३५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक १९१०१ विरार-भरूच मेमू च्या वेळेत बदल करण्यात आला असून, ती आता ०४:४५ वाजता सुटेल.