प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

Mumbai : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा; होळी सणासाठी मध्य रेल्वेच्या २० अतिरिक्त विशेष गाड्या

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने २० अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने २० अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी - मडगाव - एलटीटी साप्ताहिक विशेष गाडीच्या ४ सेवा आणि दिवा-चिपळूण-दिवा अनारक्षित विशेष गाडीच्या १६ सेवा चालविण्यात येणार आहेत. यामुळे होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

एलटीटी- मडगाव- एलटीटी साप्ताहिक विशेष गाडीच्या ४ सेवा चालविण्यात येणार आहेत. यापैकी गाडी क्रमांक ०१००३ साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवारी २ आणि ९ मार्च रोजी सकाळी ८.२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीच्या २ सेवा चालविण्यात येतील. तर ०१००४ साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर रविवारी १ आणि ८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता निघेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ५.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

या गाडीच्या २ सेवा चालविण्यात येतील. या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीची रचना १८ स्लीपर क्लास आणि २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल. विशेष ट्रेन ०१००३ साठी आरक्षण २८ फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि वेबसाइटवर सुरू होईल.

आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण  निर्णय

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला; ISMAच्या बैठकीतील आकडेवारी, एकूण ३२४ लाख टनपैकी राज्याचा वाटा ११८ लाख टन

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले

AI क्रांती ‘वायटूके’सारखी; व्यापार मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन; भारतीय कंपन्यांना फायदा होणार, नोकऱ्यांबाबत चिंता नको