संग्रहित फोटो
मुंबई

कल्याण-लोणावळा विभागात ब्लाॅक, लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम

कल्याण-लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये प्री नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत विशेष ब्लाॅक घेण्यात आला आहे. या कामामुळे मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोणावळा-बीव्हीटी यार्ड तसेच कल्याण-लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये प्री नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत विशेष ब्लाॅक घेण्यात आला आहे. या कामामुळे मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

ब्लाॅक कालावधीत लोणावळा–बीव्हीटी यार्डमधील यार्ड पुनर्रचना व इतर पायाभूत कामे हाती घेण्यात आली आहेत. २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.२५ ते सायंकाळी ६.२५ वाजेपर्यंत घेण्यात आलेल्या ब्लाॅकमुळे जोधपूर-हडपसर एक्स्प्रेस कर्जत येथे ४५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. तर सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस लोणावळा येथे एक तास, एलटीटी-मदुराई एक्स्प्रेस भिवपुरी रोड येथे १० मिनिटे, सीएसएमटी-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, सीएसएमटी-हैदराबाद एक्स्प्रेस लोणावळा येथे १० ते १५ मिनिटे थांबवण्यात येणार आहे. तसेच २७ नोव्हेंबर रोजी एलटीटी-काकीनाडा एक्स्प्रेस भिवपुरी रोड येथे १० मिनिटे थांबवण्यात येईल. २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी सीएसएमटीवरून सुटणारी सीएसएमटी-होस्पेट एक्स्प्रेस उशिरा सुटेल. त्याचप्रमाणे २९ नोव्हेंबर रोजी मदुराई-एलटीटी अतिजलद एक्स्प्रेस एलटीटी १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचेल.

निळजे-दातिवली दरम्यान ब्लाॅक

शीळफाटा येथील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त निळजे-दातिवली दरम्यान चार दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन प्रकल्पासाठी शीळ फाटा येथे असलेला उड्डाणपूल हटविण्याच्या कामासाठी हा ब्लाॅक घेतला आहे. हा ब्लाॅक २५ नोव्हेंबर, ३० नोव्हेंबर, २ आणि ७ डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री १.१० ते ०४.१० वाजेपर्यंत असेल. ब्लाॅकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. कालावधीत मंगळुरू ते सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस कळंबोली येथे ५० मिनिटे थांबविण्यात येईल. ३० नोव्हेंबर, ७ डिसेंबर रोजी दौंड ते ग्वाल्हेर अतिजलद एक्स्प्रेस कर्जत-कल्याण-वसई रोड मार्गे वळविण्यात येईल. या गाडीला कल्याण येथे थांबा देण्यात येणार आहे.

Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

विमान तिकिटे महागणार! Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही इंधन अधिभार; वाचा सविस्तर

देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही; घाबरून इंधन साठवू नका, केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन

पुण्यात धक्कादायक घटना; लिफ्टच्या दरवाज्यात अडकला चिमुकलीचा हात, CCTV व्हिडिओ व्हायरल